भारतीय बाजारात उद्या लॉन्च होणार ‘ही’ फुल ऑटोमॅटिक कार, किंमतही राहणार खूपच कमी

Ahmednagarlive24 office
Published:

Automatic Car : नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. भारतीय कार बाजारात नवीन कार लॉन्च होणार आहे. सिट्रोएन कंपनी उद्या आपल्या लोकप्रिय कारचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट बाजारात लॉन्च करणार आहे. यामुळे जर तुम्हालाही ऑटोमॅटिक एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सिट्रोएन कंपनी उद्या अर्थातच 29 जानेवारी 2024 ला सी3 एयरक्रॉस या SUV कारचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट बाजारात लॉन्च करणार आहे. खरे तर सी3 एयरक्रॉस ही गाडी गेल्या वर्षी सप्टेंबर 2023 मध्ये बाजारात लॉन्च करण्यात आली. मात्र त्यावेळी कंपनीने या कारचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट लॉन्च केले नव्हते.

आता मात्र कंपनीने या गाडीचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट देखील बाजारात लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऑटोमॅटिक व्हेरिएंट उद्या बाजारात लॉन्च होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या ऑटोमॅटिक कार विषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसे राहणार सी3 एयरक्रॉस ऑटोमॅटिक व्हेरिएंट

सिट्रोएन कंपनी उद्या सी3 एयरक्रॉस या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट बाजारात लाँच करेल. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायासह लॉन्च होणारं हे वाहन ग्राहकांमध्ये लोकप्रिय होईल अशी कंपनीला अशी आशा आहे.

या गाडीला ग्राहकांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळेल असा दावा कंपनीने केला आहे. AT गिअरबॉक्स पर्याय शीर्ष दोन ट्रिममध्ये उपलब्ध करून दिला जाण्याची अपेक्षा आहे जी प्लस आणि मॅक्स अशा प्रकारात राहणार आहेत. मॅन्युअल ट्रान्समिशन पर्यायाप्रमाणेचं उद्या भारतीय बाजारात लॉन्च होणारी C3 एअरक्रॉसला ऑटोमॅटिक कार सुद्धा 5+2 सीटिंग पर्यायासह येणार आहे.

किंमत किती राहणार ?

सिट्रोएन कंपनी उद्या ही ऑटोमॅटिक कार लॉन्च करणार आहे. मात्र या गाडीची किंमत किती राहणार याबाबत कंपनीकडून अजून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. उद्या जेव्हा ही कार लॉन्च होईल तेव्हाच कंपनीकडून या गाडीची किंमत जाहीर होणार आहे. तथापि या गाडीची किंमत दहा ते पंधरा लाख रुपयांच्या घरात राहील असा दावा प्रसार माध्यमांमध्ये केला जात आहे. त्यामुळे आता या गाडीची किंमत किती राहणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe