Kia Sonet : पुढील महिन्यापासून काही कंपन्यांच्या गाड्या महाग होणार आहेत, यात Kia च्या गाड्यांचा देखील समावेश असणार आहे. कंपनीच्या सोनेट, कॅरेन्स आणि सेल्टोसच्या किमतीत तीन टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहेत. या वाढीमागेचे प्रमुख कारण म्हणजे वस्तूंच्या वाढत्या किमती असल्याचे सांगितले जात आहे.
कंपनीच्या सोनेटची किंमत 7.99 लाख ते 14.69 लाख रुपये आहे. Kia’s Carens MPV ची किंमत 10.45 लाख ते 18.95 लाख रुपयांपर्यंत आहे. कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी सेल्टोसची किंमत सुमारे 10.90 लाख ते 20.30 लाख रुपये आहे.
अशातच किआचे विक्री आणि विपणन प्रमुख हरदीप सिंग ब्रार म्हणाले, “कंपनी आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या आणि प्रगत तंत्रज्ञानासह उत्पादने देण्याचा सतत प्रयत्न करत असते. वाढत्या वस्तूंच्या किमती आणि विनिमय दरांचा परिणाम यामुळे आम्हाला किमती वाढवाव्या लागल्या आहेत.”
मागच्या वर्षी कियाने अपडेट व्हर्जन Kia Sonet लॉन्च केले होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही कार लॉन्च करण्यात आली. या कारच्या बाह्य डिझाइनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यासोबतच ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) ही जोडण्यात आली आहे. सोनेट हे कंपनीसाठी महत्त्वाचे मॉडेल आहे. देशात विक्रीबरोबरच त्याची निर्यातही केली जाते. त्याची स्पर्धा मारुती सुझुकीच्या ब्रेझा आणि ह्युंदाईच्या व्हेन्यूशी आहे. किआची देशात सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल सेल्टोस आहे. अद्ययावत सोनेटमध्ये डीआरएलच्या डिझाइनमध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे. त्याच्या हेडलाइट्स आणि फ्रंट बंपरमध्येही बदल करण्यात आले आहेत.
हे आठ सिंगल आणि दोन ड्युअल टोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. यात 10.25 इंच मुख्य टचस्क्रीन डिस्प्ले आणि 10.25 इंच LCD ड्रायव्हर डिस्प्ले आहे. यासोबतच 360 डिग्री कॅमेरा, स्मार्ट एअर प्युरिफिकेशन सिस्टीम, सात स्पीकर्ससह बोस साउंड सिस्टीम देण्यात आली आहे. देशात किआची विक्री वाढत आहे. कंपनीकडे सेल्टोस एसयूव्हीला जोरदार मागणी आहे. या कारणास्तव त्याची उत्पादन क्षमता वाढवण्याचा आणि निर्यात कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.