Upcoming 7-Seater : जर तुम्ही सध्या 7 सीटर कार घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा कारण या वर्षी तीन नवीन कार मार्केटमध्ये येणार आहेत. या कार अगदी तुमच्या बजेटमध्ये असल्याचे बोलले जात आहे. तसेच यामध्ये तुम्हाला अनेक वैशिष्ट्ये देखील अनुभवायला मिळणार आहेत. या कार मार्केटमध्ये कधी येऊ शकतात पाहूया…
Hyundai Alcazar Facelift
या वर्षी आत्तापर्यंत Hyundai ने Creta आणि Creta N Line या दोन कार लाँच केल्या आहेत. यानंतर Hyundai Alcazar हे तिसरे मॉडेल लाँच होऊ शकते. हे वाहन मे किंवा जूनपर्यंत विक्रीसाठी येईल अशी अपेक्षा आहे. डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन Alcazar काही प्रमाणात नवीन क्रेटापासून प्रेरित असू शकते. यात खूप काही नवीन फीचर्स ग्राहकांना अनुभवायला मिळतील.
MG Gloster Facelift
MG Gloster Facelift देखील मार्केटमध्ये येण्याच्या तयारीत आहे . जर तुम्ही 7-सीटर डिझेल SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर MG Gloster फेसलिफ्ट हा एक चांगला पर्याय असू शकतो. या वर्षाच्या अखेरीस ते लॉन्च केले जाऊ शकते. या कारमध्ये तुम्हाला खूप काही खास पाहायला मिळेल.
New-Generation Toyota Fortuner
नवीन पिढीची टोयोटा फॉर्च्युनर या वर्षाच्या अखेरीस जागतिक स्तरावर लॉन्च होऊ शकते. त्यानंतर काही महिन्यांनी ती भारतातही येऊ शकते. यावेळी डिझाइन, फीचर्स आणि इंजिनमध्ये मोठे बदल होऊ शकतात. नवीन फॉर्च्युनर IMV प्लॅटफॉर्मवर तयार केले जाऊ शकते, जे अनेक इंजिनांना सपोर्ट करू शकते. यात नवीन 2.8 लीटर टर्बो डिझेल इंजिन असू शकते, ज्यामध्ये 48V सौम्य हायब्रिड तंत्रज्ञान देखील दिले जाऊ शकते.