Toyota Hyryder 7 Seater : टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या नवनवीन एसयूव्ही कार भारतात सादर करण्यात आल्या आहेत. तसेच आगामी काळात त्यांच्या आणखी नवीन एसयूव्ही कार लाँच केल्या जाणार आहेत.
फॅमिली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लवकरच बाजारात टोयोटाची नवीन 7-सीटर कार येणार आहे. या कारमध्ये कंपनीकडून पेट्रोल आणि सीएनजी इंजिन पर्याय दिला जाऊ शकतो.
टोयोटाकडून त्यांची लोकप्रिय एसयूव्ही Hyryder चे 7-सीटर कार येत्या काळात लाँच केले जाणार आहे. सध्या 5 सीटर Hyryder एसयूव्ही कार बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. या एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
टोयोटाकडून Hyryder चे 7-सीटर कार लाँच करण्यासाठी कोडनेम देखील सादर करण्यात आला आहे. फॅमिली कार खरेदी करणाऱ्यांसाठी Hyryder 7-सीटर कार उत्तम पर्याय ठरू शकते.
Hyryder 7-सीटर बाह्य डिझाइन तपशील
टोयोटाकडून त्यांच्या Hyryder 7 सीटर मॉडेलमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. कारच्या व्हिलबेसमध्ये सर्वात मोठा बदल पाहायला मिळू शकतो. कारच्या समोरची फॅसिआ पूर्णपणे पुन्हा डिझाइन केली जाणार आहे.
नवीन हायरायडर एसयूव्ही कारमध्ये अपडेटेड एलईडी डीआरएलसह विशाल लोखंडी जाळी देण्यात येईल. तसेच कारमध्ये एक नवीन बंपर आणि स्पोर्टी दिसणारी स्किड प्लेट दिली जाणार आहे. नवीन हायरायडर कारमध्ये सात प्रवाशी आरामात प्रवास करू शकतात. Hyryder 7 सीटर कारमध्ये 10-स्पोक डायमंड-कट अलॉय व्हील्स पाहायला मिळतील.
टोयोटा हायरायडर
टोयोटाकडून त्यांच्या हायरायडर एसयूव्ही कारमध्ये प्रीमियम फीचर्स देण्यात येत आहेत. सध्या बाजारात असलेल्या हायरायडर एसयूव्ही कारची एक्स शोरूम किंमत 11.14 लाख रुपयांपासून सुरू होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 20.19 लाख रुपयांपर्यंत जाते.
कारमध्ये सध्या 1.5-लिटर 4-सिलेंडर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे जे 92 bhp पॉवर आणि 122 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच कारमध्ये हायब्रीड आणि सीएनजी इंजिन पर्याय देखील देण्यात येत आहे.
टोयोटाकडून त्यांच्या नवीन हायरायडर 7 सीटर कारमध्ये हेच इंजिन पर्याय कायम ठेवले जाऊ शकतात. कारचे सीएनजी मॉडेल 28 Kmpl आणि पेट्रोल मॉडेल 20 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.
टोयोटा हायरायडर सुरक्षा वैशिष्ट्ये
टोयोटा हायरायडर एसयूव्ही कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), वाहन स्थिरता नियंत्रण (VSC), ऑल-व्हील डिस्क ब्रेक आणि 360-डिग्री कॅमेरा आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर असे फीचर्स देण्यात आले आहेत.