टोयोटाची ‘ही’ सर्वात जास्त विक्री होणारी एसयुव्ही कार झाली महाग ! 42 हजार रुपयांपर्यंत वाढली किंमत, वाचा सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:

Toyota SUV Car Price Hike : कालपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षात अनेकजण नवीन वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पाहत आहेत. अनेकांचे कार घेण्याचे स्वप्न आहे. दरम्यान ज्या लोकांना टोयोटा ची कार घ्यायची असेल अशा लोकांसाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण की, कंपनीने आपल्या काही लोकप्रिय गाड्यांच्या किमतीत मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांना नववर्षाच्या अगदी सुरुवातीलाच मोठा फटका बसणार आहे.

खरे तर टोयोटा कंपनीच्या गाड्यांची लोकप्रियता भारतीय कार बाजारात खूपच अधिक आहे. या कंपनीच्या गाड्यांचे अनेक चाहते आहेत. अनेकांना टोयोटा कंपनीची गाडी वापरणे आवडते. मात्र ज्या लोकांना या नवीन वर्षात टोयोटा कंपनीची कार खरेदी करायची असेल त्या लोकांना कार खरेदीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने क्रुझर हायरायडर, इनोवा क्रिस्टा, आणि इनोवा हायक्रॉस या कार समवेतच अन्य काही लोकप्रिय मॉडेलच्या किमती वाढवल्या आहेत. यापैकी इनोवा हायक्रॉस या गाडी बाबत बोलायचं झालं तर या गाडीची किंमत तब्बल 42 हजारापर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे जर तुम्हाला या नवीन वर्षात ईनोवा हाय क्रॉस ही गाडी घ्यायची असेल तर तुम्हाला अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

ही गाडी एकूण चार वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. तसेच कंपनीने ही गाडी सात कलर ऑप्शन मध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. अशा परिस्थितीत आता आपण या गाडीच्या नवीन सुधारित किमती विषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

गाडीची सुधारित किंमत काय

मीडिया रिपोर्टनुसार, टोयोटा कंपनीने आपल्या इनोव्हा हायक्रॉसच्या किमतीत दहा हजारापासून ते 42 हजारापर्यंतची वाढ केली आहे. यामध्ये एंट्री-लेव्हल GX व्हेरियंटची किंमत 10,000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तसेच कंपनीने या MPV च्या इतर सर्व प्रकारांच्या किंमतीत 42,000 रुपयांनी वाढ केली असल्याचे वृत्त प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आले आहे.

सोबतच कंपनीने या कारचा GX लिमिटेड एडिशन हे व्हेरियंट बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान या गाडीच्या सुधारित किमती बाबत बोलायचं झालं तर आता या गाडीच्या एन्ट्री लेव्हल व्हेरीयंटची किंमत 19 लाख 77 हजार एवढी झाली आहे. याशिवाय इतर अन्य व्हेरियंटच्या किमती या तीस लाख 68 हजार पर्यंत पोहचल्या आहेत. मात्र येथे दिलेल्या किमती या एक्स शोरूम किमती आहेत. ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe