पल्सर N 160 आणि होंडा होर्नेट या बाईक्सना टक्कर द्यायला आली टीव्हीएसची नवीन धमाकेदार अपाचे! मिळेल तीन रंगात आणि सात प्रकारात

टीव्हीएस मोटर इंडियाचे देखील अनेक बाईक भारतीय बाजारपेठेमध्ये आजपर्यंत लॉन्च केलेल्या आहेत व या कंपनीच्या बाईक देखील ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर टीव्हीएस स्पोर्ट ही अत्यंत कमीत कमी किमतीत मिळणारी उत्कृष्ट अशी टीव्हीएस कंपनीची बाईक असून ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.

Ajay Patil
Published:
new tvs appache bike

TVS Appache RTR 160 4V:- भारतामध्ये प्रामुख्याने जर आपण बाईक बाजारपेठ बघितली तर यामध्ये होंडा, हिरो तसेच बजाज या कंपन्यांच्या सर्वाधिक बाइक दिसून येतात व भारतीय ग्राहकांमध्ये या तिन्ही कंपन्यांच्या बाईक्सला विशेष पसंती आणि लोकप्रियता असल्याचे आपल्याला दिसून येते.

या कंपन्याशिवाय भारतीय बाईक बाजारपेठेमध्ये यामाहा, सुझुकी तसेच टीव्हीएस या कंपन्यांचे देखील तितकेच वर्चस्व आहे व त्यातल्या त्यात टीव्हीएस मोटर इंडियाचे देखील अनेक बाईक भारतीय बाजारपेठेमध्ये आजपर्यंत लॉन्च केलेल्या आहेत व या कंपनीच्या बाईक देखील ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर टीव्हीएस स्पोर्ट ही अत्यंत कमीत कमी किमतीत मिळणारी उत्कृष्ट अशी टीव्हीएस कंपनीची बाईक असून ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.

याचेच पुढचे पाऊल म्हणून आता टीव्हीएस मोटर इंडियाने काल म्हणजेच 19 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्या लोकप्रिय असलेली बाईक अपाचीचे टॉप व्हेरिएंट RTR 160 4V लॉन्च केले असून सात प्रकारांमध्ये सध्या ही बाईक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

टीव्हीएस मोटर इंडियाने लाँच केली अपाची RTR 160 4V बाईक
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय बाईक बाजारपेठेतील लोकप्रिय असलेल्या टीव्हीएस मोटर इंडिया या कंपनीने 19 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्या लोकप्रिय असलेल्या अपाची या बाईकचे RTR 160 4V हे टॉप वेरियंट लॉन्च केले असून ही बाईक सध्या सात प्रकारांमध्ये कंपनीने उपलब्ध करून दिलेली आहे. अपाचेचा हा नवीन प्रकार हिरो एक्स्ट्रीम 160R, पल्सर एनएस 160, होंडा होर्नेट 2.0 या बाईकशी प्रामुख्याने बाजारपेठेत स्पर्धा करेल.

अपाचीच्या या नवीन प्रकारामध्ये टीव्हीएस कंपनीने अनेक महत्त्वपूर्ण असे बदल केले असून या बाईकचा लुक आकर्षक असा बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आलेला आहे. हा नवीन प्रकार चमकदार सोनेरी रंगाच्या अपसाईड डाऊन फ्रंट फेंडर्स, स्टबियर बुलपअप एक्झॉस्ट आणि तीन नवीन रंग पर्यायांसह सादर करण्यात आला आहे.

जर आपण या बाईकचे तीन रंग बघितले तर यामध्ये मॅट ब्लॅक,पर्ल व्हाईट आणि ग्रॅनाईट ग्रे या तीन रंगांचा यामध्ये समावेश आहे.इतकेच नाहीतर टीव्हीएस अपाचीच्या या नवीन अपडेटेड बाईकला स्पोर्टी लूक मिळावा याकरिता रेस प्रेरित ग्राफिक्स आणि लाल रंगाचे अलॉय व्हील देण्यात आले आहेत.

किती आहे या बाईकची किंमत
टीव्हीएस अपाचीच्या नवीन RTR 160 4V या नवीन व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 1 लाख 40 हजार रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe