Upcoming 7-Seater Cars : बाजारात लॉन्च होणार ‘या’ 4 नवीन आलिशान कार्स ! नवीन फॉर्च्युनरचाही समावेश

Ahmednagarlive24 office
Published:
Upcoming 7-Seater Cars

Upcoming 7-Seater Cars : भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या आलिशान कार सादर करण्यात आल्या आहेत. मोठ्या फॅमिलीसाठी कार खरेदी करताना अनेकजण 7 सीटर कारचा पर्याय निवडत असतात.

आगामी काळात अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या नवनवीन 7 सीटर कार लॉन्च करणार आहेत. यामध्ये टोयोटाच्या नवीन जनरेशन फॉर्च्युनर कारचा देखील समावेश आहे. आगामी 7 सीटर कारमध्ये आलिशान फीचर्स देण्यात येणार आहेत.

MG ग्लोस्टर फेसलिफ्ट

MG कार उत्पादक कंपनीकडून त्यांची ग्लोस्टर फेसलिफ्ट एसयूव्ही कार यावर्षी लॉन्च केली जाणार आहे. कारमध्ये जबरदस्त अपडेट्स पाहायला मिळतील.

सध्या ग्लोस्टर फेसलिफ्ट एसयूव्ही कारची चाचणी देखील सुरु करण्यात आली आहे. 2024 च्या उत्तरार्धात ही कार लॉन्च केली जाणार आहे. ही कार 2.0L टर्बो डिझेल इंजिनसह सुसज्ज असेल. 4X4 आणि 4X2 आवृत्तीमध्ये ही कार सादर केली जाईल.

नवीन जनरेशन टोयोटा फॉर्च्युनर

टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांची लोकप्रिय फॉर्च्युनर आता नवीन जनरेशनमध्ये लॉन्च केली जाणार आहे. 2024 च्या उत्तरार्धात नवीन जनरेशन फॉर्च्युनर लॉन्च केली जाणार आहे.

नवीन जनरेशन फॉर्च्युनर TNGA-F प्लॅटफॉर्मवर तयार केली जाणार आहे. कारमध्ये 2.8L टर्बो डिझेल इंजिन दिले जाईल जे 48V सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानासह सादर केले जाईल.

Kia EV9

किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांची दुसरी इलेक्ट्रिक कार EV9 फॅमिली कार लॉन्च केली जाणार आहे. EV9 76kWh बॅटरी पॅकसह सादर केली जाणार आहे.

तसेच कारमध्ये दुसरा 99.8kWh बॅटरी पॅक देण्यात येणार आहे. EV9 76kWh पॅक 358 किमी रेंज देण्यास सक्षम असेल. तर 99.8kWh बॅटरी पॅक 541 किमी रेंज देण्यास सक्षम असेल.

नवीन जनरेशन स्कोडा कोडियाक

स्कोडा कार कंपनीकडून त्यांची आणखी एक 7 सीटर फॅमिली कार 2024 मध्ये भारतात लॉन्च केली जाणार आहे. नवीन जनरेशन स्कोडा कोडियाक कारमध्ये अनके बदल पाहायला मिळतील.

कारमध्ये 340 लिटरची बूट स्पेस देण्यात येईल. कारमध्ये 1.5L TSI पेट्रोल आणि 2.0L TSI, 2.0L TDI डिझेल इंजिन देण्यात येणार आहे. कारचे इंजिन 7-स्पीड DSG गिअरबॉक्सशी जोडलेले असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe