कार खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! मार्च महिन्यात लॉन्च होणार ‘या’ चार नवीन एसयूव्ही कार

Tejas B Shelar
Published:
Upcoming Car

Upcoming Car : कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही नवीन कार खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला आता बाजारात नवीन ऑप्शन उपलब्ध होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात म्हणजे मार्च 2023 मध्ये भारतीय ऑटो मार्केटमध्ये काही नवीन गाड्यांची लॉन्चिंग होणार आहे.

मार्च महिन्यात भारतीय बाजारात 4 नवीन SUV कार लाँच होणार असे वृत्त एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समोर आले आहे. दरम्यान, आज आपण मार्च महिन्यात भारतीय बाजारात कोणत्या नवीन एसयूव्ही कार लॉन्च होणार आहेत याबाबतची सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

ह्युंदाई क्रेटा एन लाइन : Hyundai Motor लवकरच भारतीय बाजारात एक नवीन एसयुव्ही कार लॉन्च करणार आहे. ही कंपनीची या चालू वर्षातील दुसरी सर्वात मोठी लॉन्चिंग राहणार आहे. मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर कंपनीच्या माध्यमातून 11 मार्च रोजी नवीन Creta ची N Line आवृत्ती लॉन्च केली जाणार आहे.

i20 आणि Venue N Line आवृत्तीनंतर भारतात लॉन्च होणारे हे तिसरे N Line मॉडेल राहणार आहे. Hyundai N Line मॉडेल हे काही बदलांसह सध्याच्या मॉडेल्सची स्पोर्टियर आवृत्ती राहील. ह्युंदाई कंपनीच्या क्रेटा या कारच्या चाहत्यांसाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे.

BYD सील : चीनी EV कार निर्माती कंपनी भारतीय बाजारात लवकरच एक नवीन इलेक्ट्रॉनिक कार लॉन्च करणार आहे. BYD भारतात तिसरी इलेक्ट्रिक कार सादर करण्यासाठी सज्ज असल्याची बातमी नुकत्याच काही दिवसांपूर्वी समोर आली आहे.

बीवायडी सील ईव्ही पहिल्यांदा गेल्या वर्षी जानेवारीमध्ये ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती आणि आता ती 5 मार्च रोजी लॉन्च केली जाणार आहे. यामुळे जर तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला बाजारात आणखी एक नवीन विकल्प उपलब्ध होणार आहे.

टाटा नेक्सॉन डार्क एडिशन : टाटा मोटर्स ही भारतीय कंपनी मार्च महिन्यात एक नवीन कार लॉन्च करणार आहे. कंपनी नेक्सॉनची डार्क एडिशन मार्च 2024 मध्ये लॉन्च करू शकते अशी बातमी समोर येत आहे. नावाप्रमाणेच, Nexon Dark ब्लॅक रंगाच्या बाह्य थीमसह लॉन्च केली जाईल अशी अपेक्षा आहे.

यात टाटाची ग्लॉसी मिडनाईट ब्लॅक एक्सटीरियर कलर स्कीम तसेच ब्लॅक आऊट अलॉय व्हील मिळण्याची शक्यता आहे. आतील भागात सर्व-काळ्या ट्रीटमेंटसह थीमशी जुळेल. त्यात कोणताही यांत्रिक बदल होणार नाही हे मात्र विशेष राहणार आहे. अर्थातच या कारमध्ये आधीचेच इंजिन वापरले जाणार आहे.

मारुती सुझुकी स्विफ्ट : भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी मार्च महिन्यात आपल्या लोकप्रिय स्विफ्ट कार चे नवीन वर्जन बाजारात उतरवणार आहे. कंपनी 4th जनरेशन मारुती सुझुकी स्विफ्ट मार्च महिन्यात लॉन्च करणार असे वृत्त समोर आले आहे.

ही कंपनीची या वर्षातील पहिलेच मोठी लॉन्चिंग राहणार आहे. नवीन स्विफ्ट अनेक बदलांसह बाजारात लॉन्च केली जाणार आहे. यात नवीन 3-सिलेंडर इंजिन समाविष्ट राहील जे की, उत्तम इंधन कार्यक्षमता प्रोव्हाइड करणार आहे. या गाडीमध्ये उत्कृष्ट इंटेरियर देखील राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe