इलेक्ट्रिक कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी गुड न्युज! भारतीय बाजारात लवकरच लॉन्च होणार ‘या’ 3 नवीन कार

Tejas B Shelar
Published:
Upcoming Electric Car

Upcoming Electric Car : तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आहे. विशेषता ज्यांना इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही अपडेट अधिक खास राहणार आहे.

कारण की, भारतीय बाजारात लवकरच तीन नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च होणार असे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे जर तुम्हालाही इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला आत्तापासूनच पैशांची जमवाजमव करून ठेवावी लागेल.

खरंतर, इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचा पोर्टफोलिओ सर्वाधिक मजबूत आहे. टाटा कंपनीची इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये जोरदार पकड आहे. या कंपनीचा इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये 75 टक्के वाटा आहे.

विशेष म्हणजे टाटा लवकरच आणखी एक नवीन इलेक्ट्रिक कार बाजारात उतरवणार आहे. या सेगमेंटमध्ये देशात सर्वाधिक कार विक्री करणारी मारुती सुझुकी कंपनी देखील आपला दबादबा तयार करणार आहे. मारुती सुझुकी लवकरच आपली पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यास सज्ज झाली आहे.

तसेच ह्युंदाई ही कंपनी देखील आपला इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ चांगला बनवण्यासाठी नवीन इलेक्ट्रिक कार बाजारात उतरवणार अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता आपण या तिन्ही कंपन्यांच्या नव्याने लॉन्च होणाऱ्या तीन नवीन इलेक्ट्रिक कारची माहिती थोडक्यात पाहणार आहोत.

Tata Curvv EV : भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी आणि इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी म्हणून टाटाची ओळख आहे. दरम्यान, टाटा मोटर्स या चालू वर्षाच्या अखेरीस आपली नवीन इलेक्ट्रिक मिड-साईज SUV Curve लाँच करण्याच्या तयारीत असल्याची बातमी पुढे आली आहे.

ही कार Acti.EV प्लॅटफॉर्मवर आधारित राहणार आहे. ही नव्याने लाँच होणारी कार एकदा चार्ज केली की 500 km पर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देणार असा दावा होत आहे. या कारमध्ये ग्राहकांना ADAS तंत्रज्ञानासह फ्लोटिंग टचस्क्रीन आणि डिजिटल क्लस्टर देखील मिळणार आहे.

Hyundai Creta EV : Hyundai India, लवकरच नवीन इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहे. मारुती सुझुकी नंतर ही भारतातील दुसरी सर्वात मोठी कार विकणारी कंपनी म्हणून ख्यातनाम आहे.

ही कंपनी आता तिच्या सर्वात लोकप्रिय अन सर्वाधिक विक्री होणाऱ्या Creta चे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Hyundai Creta EV 2025 च्या सुरूवातीला लॉन्च होऊ शकते.

मारुती सुझुकी eVX : मारुती सुझुकी भारतात सर्वाधिक कार विकते. मात्र हे जरी खरे असले तरी इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये अजूनही या कंपनीला टाटाची तोड मिळालेली नाही. इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा मारुती सुझुकी पेक्षा खूप पुढे आहे.

पण आता इलेक्ट्रिक वाहनांची वाढती प्रेस पाहता आणि भविष्यात इलेक्ट्रिक कारचीच डिमांड राहणार असल्याने मारुती सुझुकी देखील लवकरच इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये आपली पकड मजबूत करणार आहे. कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यास सज्ज झाली आहे.

मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार 2024 च्या उत्तरार्धात किंवा 2025 च्या सुरुवातीला लॉन्च केली जाऊ शकते. या इलेक्ट्रिक कारमध्ये ग्राहकांना 550 किलोमीटरची रेंज मिळले असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe