Hyundai SUV Discount Offers : क्या बात हैं! ह्युंदाईच्या ‘या’ जबरदस्त SUV कार्सवर थेट 4 लाख रुपयांपर्यंत सूट, बघा खास ऑफर

Hyundai SUV Discount Offers : Hyundai एप्रिल 2024 मध्ये तिच्या अनेक शक्तिशाली SUV मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. यामध्ये Hyundai Venue, Venue N Line, Alcazar, Tucson आणि Kona Electric या मॉडेल्सचा समावेश आहे. अशा परिस्थितीत कार खरेदी करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. SUV प्रेमींनी चुकूनही ही संधी सोडू नये. तथापि, एक्सेटर आणि क्रेटा सारख्या लोकप्रिय मॉडेल्सवर सध्या कोणत्याही सवलतीच्या ऑफर उपलब्ध नाहीत. कंपनी कोणत्या वाहनावर किती सूट देत आहे. पाहूया…

Hyundai Venue

यादीतील पहिल्या कारबद्दल बोलायचे झाले तर त्यात पहिले नाव Hyundai Venue चे येथे. टर्बो-पेट्रोल मॅन्युअल वेरिएंटवर 35,000 रुपयांपर्यंत आणि ड्युअल-क्लच व्हेरिएंटवर 30,000 रुपयांपर्यंत सूट आहे. वाहनात 83 bhp, 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आणि 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. Hyundai Venue ही थेट Kia Sonet, Tata Nexon आणि आगामी Mahindra XUV 3XO सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करते.

Hyundai Venue N Line

Hyundai Venue N Line कॉम्पॅक्ट SUV वर 30,000 पर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये रोख सवलत आणि एक्सचेंज बोनसचाही समावेश आहे. Venue N Line ला 120 bhp, 1.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन मिळते. Hyundai Venue N Line च्या किमती 12.08 लाख ते 13.90 लाख रुपयांपर्यंत आहेत.

Hyundai Alcazar

खरेदीदार Hyundai Alcazar च्या पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही मॉडेल्सवर एक्सचेंज बोनस आणि 55,000 पर्यंत रोख सवलत देत आहे. Alcazar टाटा सफारी आणि एमजी हेक्टर प्लसला टक्कर देते. Hyundai Alcazar ची किंमत 16.78 लाख ते 21.28 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

Hyundai Tucson

Hyundai Tucson च्या MY2023 डिझेल मॉडेलवर कंपनी 2 लाख रुपयांपर्यंत रोख सूट देत आहे. पेट्रोल व्हेरिएंटवर 50,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. टक्सन पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे आणि जीप कंपास आणि फोक्सवॅगन टिगुआन सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करते. Hyundai Tucson भारतात 29.02 लाख ते 35.94 लाख (एक्स-शोरूम) मध्ये खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहे.

Hyundai Kona Electric

या यादीतील सर्वाधिक सवलत Hyundai Kona Electric वर उपलब्ध आहे. कंपनी या वाहनावर 4 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. यामुळे त्याची किंमत लक्षणीयरीत्या कमी होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe