सणासुदींचा कालावधी आणि वाहन खरेदी याची परंपरा भारतामध्ये फार वर्षांपासून असून दिवाळी किंवा दसरा आणि घटस्थापनेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची खरेदी केली जाते. यामध्ये बाईक आणि कार खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून या कालावधीत नवनवीन वैशिष्ट्ये असलेली अनेक दुचाकी आणि कार बाजारपेठेत लाँच केल्या जातात.
बाईक उत्पादनाच्या बाबतीत पाहिले तर भारतामध्ये हिरो मोटोकॉर्प ही कंपनी खूप प्रसिद्ध असून या कंपनीने आतापर्यंत अनेक परवडणाऱ्या किमतींमध्ये बाईक लॉन्च केलेले आहेत.
याच अनुषंगाने आता कंपनीने त्यांच्या फ्लॅगशिप मोटरसायकलचे एक स्पेशल व्हर्जन सादर केले असून ही मोटर सायकल खरेदी करण्यासाठी तुम्हाला थम्सअप स्कॅन करावे लागणार आहे? वाचल्यानंतर पडलात ना बुचकाळ्यात? हे खरे आहे. कारण हिरो मोटो कॉर्प आणि कोको कोला या दोन्ही कंपन्यांनी या फ्लॅगशिप मोटरसायकल सादर करण्याकरिता भागीदारी केलेली असून या मोटरसायकलचे नाव मॅव्हरिक 440 थंडरव्हील्स असे आहे.
थम्स अप स्कॅन करून कशी खरेदी करता येईल मॅवरिक 440 थंडरव्हिल्स?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे थम्स अपच्या माध्यमातून याकरिता एक प्रोमो पॅक लॉन्च करण्यात आला असून थम्स अपवर जेथे लोगो असते त्याच्या मागे एक क्यूआर कोड दिलेला आहे.
तो स्कॅन करणे आवश्यक असून थम्सअप खरेदीदाराला स्पर्धेत भाग घेण्याकरिता तो कोड टाकणे आवश्यक राहील. यामध्ये लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की ही लिमिटेड एडिशन मोटरसायकल केवळ 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत थम्स अपचे स्पेशल एडिशन पॅक खरेदी करून स्कॅन करणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.
फायनान्शिअल एक्सप्रेसने दिली आहे ही महत्त्वाची माहिती
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी काही स्टेप्स फॉलो करणे गरजेचे आहे व त्या स्टेप्स म्हणजे….
थम्सअप चार्ज केलेला प्रोमो पॅक खरेदी करावा लागेल व त्यानंतर लेबलच्या मागील क्यूआर कोड स्कॅन करून मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागेल. क्यूआर कोड जेव्हा तुम्ही स्कॅन कराल त्यानंतर युनिक आयडी तुम्हाला एंटर करावे लागेल व त्यानंतर विजेत्याला लिमिटेड एडिशन हिरो मॅव्हरिक 440 थंडरव्हील्स मिळेल.
कशी आहे हिरो मोटोकॉर्पची मॅव्हरिक 440 थंडरव्हील्स?
या बाईकमध्ये कंपनीने 440cc एअर ऑइल कुल्ड इंजिन दिले असून हे इंजिन 6000 rpm वर 27 बीएचपी आणि 4000 आरपीएम वर 36 एनएमचा टॉर्क जनरेट करते. तसेच या बाईकमध्ये स्लीपर क्लच व त्यासोबत सहा स्पीड गिअर बॉक्स देण्यात आलेला आहे. 43 मिमीचा फ्रंट टेलिस्कोपिक फॉर्क्स, १३० मीमी मागील ट्विन शॉक सस्पेन्शन देण्यात आलेले आहे. 17 इंच व्हील्सवर चालणाऱ्या या बाईकमध्ये 320 मीमी फ्रंट डिस्क ब्रेक व मागच्या चाकांना 240 मिमी डिस्क ब्रेक असणार आहे.
किती आहे या बाईकची किंमत?
हिरो मोटोकॉर्पच्या या बाईकची एक्स शोरूम किंमत साधारणपणे एक लाख 99 हजारापासून सुरू होऊन दोन लाख 24 हजार रुपयांपर्यंत असणार आहे.