नुकतीच लॉन्च झालेली धमाकेदार MG Windsor इलेक्ट्रिक कार घ्यायची आहे का? 2 लाख रुपये डाऊनपेमेंट करून किती लागेल ईएमआय?

एमजी विंडसर EV या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत पाहिली तर ती साधारणपणे दहा लाख रुपये आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला 20% डाऊन पेमेंट म्हणजेच दहा लाखाचे 20 टक्के म्हणजेच दोन लाख रुपये डाऊनपेमेंट भरणे गरजेचे राहिलं व कर्ज रक्कम म्हणून तुम्हाला 80 टक्के बँकेच्या माध्यमातून म्हणजे जवळपास आठ लाख रुपये बँक कर्ज स्वरूपात देईल. 

Ajay Patil
Published:
mg windsor car

भारतामध्ये सध्या सणासुदीचा कालावधी गणेश चतुर्थी पासून सुरू झाला असून आता येणाऱ्या कालावधीत नवरात्री उत्सव तसेच दिवाळी यासारख्या महत्त्वाच्या सणांचा कालावधी आहे. त्यामुळे सगळीकडे सणांचा उत्साह आपल्याला सुरू असताना दिसून येत आहे.या कालावधीमध्ये अनेक व्यक्ती हे एखाद्या शुभ मुहूर्तावर कार किंवा बाईक खरेदी करतात.

त्यामुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून देखील आता वेगवेगळ्या प्रकारच्या कार लॉन्च केल्या जात आहे. यामध्ये इलेक्ट्रिक कार देखील लॉन्च केल्या जात असून नुकतीच भारतीय बाजारपेठेत  MG Windsor EV भारतीय बाजारपेठेमध्ये दाखल झालेली असून कारची रचना तसेच  वैशिष्ट्ये खूप वेगळी असल्याने ग्राहकांना  आकर्षित करू शकते.

त्यामुळे तुम्हाला देखील या सणासुदीच्या कालावधीत इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल  तर आपण या लेखात एमजी विंडसर EV कार ची किंमत तसेच डाऊन पेमेंट व मिळणारे कर्ज याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत.

MG Windsor EV वर मिळणाऱ्या कर्जाचे कॅल्क्युलेशन

जर आपण एमजी विंडसर EV या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत पाहिली तर ती साधारणपणे दहा लाख रुपये आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला 20% डाऊन पेमेंट म्हणजेच दहा लाखाचे 20 टक्के म्हणजेच दोन लाख रुपये डाऊनपेमेंट भरणे गरजेचे राहिलं व कर्ज रक्कम म्हणून तुम्हाला 80 टक्के बँकेच्या माध्यमातून म्हणजे जवळपास आठ लाख रुपये बँक कर्ज स्वरूपात देईल.

यामध्ये जर बँकेच्या माध्यमातून नऊ टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी तुम्ही कर्ज घेतले तर या कारकरीता तुम्हाला मासिक ईएमआय 12871 रुपये इतका भरावा लागेल. अशाप्रकारे घेतलेल्या आठ लाख रुपये कर्जावर तुम्हाला सात वर्षाच्या कालावधीत एकूण दोन लाख 81 हजार 186 रुपये व्याज द्यावे लागेल.

 नऊ टक्के व्याजदराने सहा वर्षासाठी कर्ज घेतले तर

ही कार खरेदी करण्यासाठी तुम्ही 9% व्याजदराने दहा वर्षांकरिता कर्ज घेतले तर मासिक ईएमआय 14,420 रुपये तुम्हाला भरावा लागेल व सहा वर्षाच्या परतफेडीसाठी तुम्हाला दोन लाख 38 हजार 271 रुपये व्याज द्यावे लागेल.

 नऊ टक्के दराने पाच वर्षासाठी कर्ज घेतले तर

समजा तुम्ही या कारसाठी 9% व्याजदराने पाच वर्षाकरिता आठ लाख रुपये लोन घेतले तर यावर मासिक ईएमआय 16607 रुपये तुम्हाला भरावा लागेल आणि या कर्जावर तुम्हाला एक लाख 96 हजार 401 रुपये इतके व्याज भरावे लागेल.

 काय आहेत एमजी विंडसर ईव्हीची वैशिष्ट्ये?

या कारमध्ये 38kWh बॅटरी पॅक मिळतो व त्याची रेंज 331 किलोमीटर आहे. तसेच समोरच्या चाकांना ऊर्जा मिळावी याकरिता इलेक्ट्रिक मोटर 134bhp पावर आणि 200Nm टॉर्क जनरेट करण्यास ती सक्षम आहे व या कारमध्ये इको, इको+, नॉर्मल आणि स्पोर्ट असे चार ड्रायव्ह मोड देण्यात आले आहे.

आतील सीटवर क्विल्टेड पॅटर्न उपलब्ध आहे. यामध्ये एक उत्तम सीटबॅक ऑप्शन देण्यात आलेला आहे.जो 135 अंशांपर्यंत इलेक्ट्रिकली वाकु शकतो किंवा टिल्ट करू शकतो. कनेक्टिव्हिटी साठी यामध्ये युएसबी चार्जिंग पोर्ट, एसी रियर व्हेन्ट आणि कप होल्डर सह सेंटर आर्मरेस्ट मिळेल.

तसेच वायरलेस फोन मिररिंग, वायरलेस चार्जर, 360 डिग्री कॅमेरा, टेंपरेचर कंट्रोल, कार टेक्नॉलॉजी, रिक्लायनिंग रियर सीट, पॅनोरेमिक सनरूफ यासारखे वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहे.

तसेच नाईट कंट्रोल, जिओ एप्स आणि एका पेक्षा जास्त भाषांमध्ये कनेक्टिव्हिटी, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सहा एअरबॅग्स आणि इबिडी सह एबीएस देण्यात आला असून पूर्ण एलईडी पद्धतीची लायटिंग देण्यात आलेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe