सणासुदीच्या कालावधीमध्ये आता बऱ्याच जणांची कार खरेदी करण्याची इच्छा असेल व याकरिता कारलोन घेण्याचा प्लॅनिंग डोक्यामध्ये सुरू असेल. कारण सध्याच्या कालावधीमध्ये कारलोन सहजरित्या बँकांच्या माध्यमातून मिळते व त्याची प्रक्रिया देखील आता सोपी व सुटसुटीत करण्यात आलेली आहे.
परंतु कारलोन घेताना तुम्हाला सर्वात कमीत कमी व्याजदर कोणत्या बँकेच्या माध्यमातून मिळेल हे पाहणे खूप गरजेचे असते. कारण घेतलेल्या कर्ज परतफेडीवर व्याजदराचा खूप मोठा प्रभाव पडत असल्यामुळे तुम्हाला ज्या ठिकाणाहून कमी व्याजदरात कार लोन उपलब्ध होईल अशा ठिकाणाहून तुम्ही कारलोन घेऊन कार खरेदी करणे फायद्याचे ठरेल.
या अनुषंगाने या लेखामध्ये आपण कोणत्या बँकेकडून तुम्ही दहा लाखांचे कार लोन घेतले तर किती ईएमआय भरावा लागेल व त्या बँकांचा व्याजदर इत्यादी बद्दल माहिती बघणार आहोत.
दहा लाखाच्या कार लोनवर किती भरावा लागेल ईएमआय?
1- युनियन बँक ऑफ इंडिया– युनियन बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्त्वाची बँक असून ही बँक कारलोन वर सध्या 8.70% व्याज आकारत आहे. या परिस्थितीत तुम्ही या बँकेकडून दहा लाख रुपये कारलोन घेतले तर तुम्हाला महिन्याला 24565 रुपये ईएमआय भरावा लागेल.
2- स्टेट बँक ऑफ इंडिया– स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या कारलोनवर 8.75 टक्के व्याजदर आकारात असून या बँकेकडून जर तुम्ही दहा लाख रुपये कारलोन घेतले तर तुम्हाला महिन्याला 24 हजार 587 रुपये इतका ईएमआय भरावा लागेल.
स्टेट बँके इतकाच ईएमआय पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक आणि इंडियन बँकेला देखील भरावा लागेल. कारण या बँकांच्या माध्यमातून देखील कारलोनवर 8.75 टक्के व्याजदर आकारला जातो.
3- बँक ऑफ इंडिया– बँक ऑफ इंडिया कारलोन वर 8.85% व्याजदर आकारत असून या बँकेकडून जर तुम्ही दहा लाख रुपये कारलोन घेतले तर तुम्हाला महिन्याला 24632 रुपये ईएमआय भरावा लागेल.
4- बँक ऑफ बडोदा– बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून चार वर्षाच्या कालावधी करिता कारलोन देत असून या कालावधीसाठी बँकेकडून 8.90% दराने व्याज आकरण्यात येत आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला दहा लाख रुपये कारलोन वर महिन्याला 24 हजार 655 रुपये ईएमआय भरावा लागेल.
5- आयसीआयसीआय बँक– आयसीआयसीआय बँक कारलोन वर 9.10% व्याजदर आकारत असून या बँकेच्या माध्यमातून तुम्ही दहा लाख रुपये कारलोन घेतले तर त्यावर ईएमआय 24745 रुपये प्रत्येक महिन्याला भरावा लागेल.
6- ॲक्सिस बँक– ॲक्सिस बँक कारलोन वर 9.30% व्याजदर आकारात असून बँकेकडून तुम्ही दहा लाख रुपये कारलोन घेतले तर तुम्हाला महिन्याला 24835 रुपये ईएमआय भरावा लागेल.
7- एचडीएफसी बँक– एचडीएफसी बँक कारलोन वर 9.40% इतका व्याजदर आकारात असून या बँकेकडून तुम्ही दहा लाख रुपयांचे कारलोन घेतले तर तुम्हाला महिन्याला 24881 रुपये ईएमआय भरावा लागेल.