SUV Discount : कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर भारतीय बाजारात एसयूव्ही कारची मोठी डिमांड आहे. सेडान कार खरेदी करणाऱ्यांपेक्षा एसयूव्ही कार खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
विशेषतः तरुणांना SUV कार अधिक आवडते. दरम्यान एसयुव्ही कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी Nissan या देशातील प्रमुख ऑटो कंपनीच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे निसान कंपनी नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच आपल्या ग्राहकांना मोठी भेट देत आहे. कंपनी त्यांच्या SUV Magnite वर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे.
यामुळे ज्यांना Magnite कार खरेदी करायची असेल त्यांचे मोठे पैसे वाचणार आहेत. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, या चालू महिन्यात म्हणजे जानेवारी 2024 मध्ये ही SUV खरेदी केल्यास तुम्हाला 87,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे.
या डिस्काउंट ऑफर मध्ये एक्सचेंज ऑफर, ॲक्सेसरीज, कॉर्पोरेट डिस्काउंट, लॉयल्टी बोनस यांसारख्या विविध सवलतीचा समावेश राहणार आहे. एवढेच नाही तर कंपनी ऑनलाइन बुकिंगवर अतिरिक्त सवलतीसह अत्यंत कमी व्याजदरात कार लोन देखील उपलब्ध करून देत आहे. Nissan Magnite ची एक्स-शोरूम किंमत 599,900 रुपये आहे. दरम्यान आता आपण या कारवर दिल्या जाणाऱ्या ऑफरची संपूर्ण माहिती थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
काय आहे ऑफर:- कंपनीकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कंपनी या महिन्यात अर्थातच जानेवारी 2024 साठी Magnite या निसान कंपनीच्या लोकप्रिय कारवर एकूण 87 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट ऑफर करत आहे.
एवढेच नाही तर कंपनीकडून या कारच्या खरेदीवर गोल्ड सर्व्हिस पॅकही दिला जात आहे. अर्थातच ज्यांना ही एसयुव्ही कार खरेदी करायची असेल त्यांचे हजारो रुपये वाचणार आहेत. दरम्यान आता आपण ही ऑफर नेमकी आहे तरी कशी ? हे जाणून घेणार आहोत.
मिळालेल्या माहितीनुसार या ऑफर अंतर्गत निसान कंपनीची ही Magnite कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांना सुमारे 28,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनस मिळणार आहे. ग्राहकांनी Magnite खरेदी करण्यासाठी कंपनीच्या Nissan Renault कडून 2 वर्षांसाठी 3.93 लाख रुपये फायनान्स केले तर त्यांना 6.99% व्याजदराने कर्ज मिळेल.
अशा प्रकारे, तुम्हाला या मॉडेलवर 87,000 रुपये नफा मिळेल. ही ऑफर या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंतच वैध असेल, याची मात्र ग्राहकांनी नोंद घ्यायची आहे. म्हणजे जर या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर ग्राहकांना ही कार या महिन्याच्या अखेरपर्यंत खरेदी करावी लागणार आहे.