मोठी बातमी ! बाजारात लवकरच लॉन्च होणार ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर, पैसा तयार ठेवा

Upcoming Electric Scooter : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढली आहे. प्रामुख्याने इलेक्ट्रिक स्कूटरला भारतीय बाजारात मोठी मागणी असल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे याच संधीचे सोने करून अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च केल्या आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरला भारतीय ग्राहकांनी चांगला प्रतिसाद देखील दाखवला आहे. विशेष म्हणजे येत्या काही महिन्यात भारतात आणखी काही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार आहेत.

यामुळे जर तुम्हाला नजीकच्या भविष्यात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर आत्तापासूनच पैशांची जमवाजमव करून ठेवावी लागणार आहे. दरम्यान आता आपण नजीकच्या भविष्यात कोणत्या कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करतील या विषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

TVS iQube ST :

मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर टीव्हीएस या देशातील लोकप्रिय दुचाकी निर्माती कंपनीच्या माध्यमातून लवकरच एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली जाऊ शकते. TVS मोटर्स लवकरच एक नवीन इलेक्ट्रिक दुचाकी भारतीय बाजारात लॉन्च करणार असे बोलले जात आहे.

कंपनी बहुप्रतिक्षित iQube ST स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. विशेष म्हणजे ही कंपनीची भन्नाट इलेक्ट्रिक स्कूटर पूर्णपणे नवीन स्वरूपात बाजारात लॉन्च होणार आहे.

यामुळे जर तुम्हाला टीव्हीएसचा इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायचा असेल तर आत्तापासूनच पैसे जमवून ठेवावे लागणार आहेत.

Ather Rizta :

भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक कंपन्या दरवर्षी नवनवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करत आहेत. या नवीन वर्षातही देशातील अनेक आघाडीच्या स्कूटर उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.

Ather देखील नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. कंपनीने आपल्या नवीनतम टीझरमध्ये आगामी मॉडेल Rizta सादर केले आहे. ही स्कूटर येत्या सहा महिन्यांत लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Honda Activa Electric :

Honda ही भारतातील एक लोकप्रिय दुचाकी निर्माती कंपनी आहे. या कंपनीच्या मोटरसायकल ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. या कंपनीच्या पेट्रोल स्कूटर देखील ग्राहकांना विशेष आवडतात. होंडा एक्टिवा ही कंपनीची एक लोकप्रिय स्कूटर असून

भारतात सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर म्हणून ती संपूर्ण जगात ख्यातनाम आहे. दरम्यान कंपनीच्या माध्यमातून याच लोकप्रिय Activa स्कूटरचे इलेक्ट्रिक व्हर्जन लवकरच लॉन्च केले जाणार आहे.

ओला इलेक्ट्रिक स्कूटर :

ओला इलेक्ट्रिक ही इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये आघाडीची कंपनी बनली आहे. या कंपनीच्या अनेक इलेक्ट्रिक स्कूटर सध्या भारतीय बाजारात धुमाकूळ घालत आहेत. दरम्यान कंपनीने अलीकडेच एक नवीन पेटंट फाईल केले आहे.

या फाइलिंगवरून असे दिसून आले आहे की कंपनी व्यावसायिक हेतूंसाठी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. आगामी स्कूटरमध्ये कमीतकमी बॉडीवर्क, सिंगल-सीटर डिझाइन आणि बदलण्यायोग्य बॅटरी राहणार असा देखील दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.

सुझुकी बर्गमन इलेक्ट्रिक :

सुझुकी ही देखील एक आघाडीची स्कूटर निर्माती कंपनी आहे. या कंपनीच्या स्कूटर आपल्या भारतात खूपच लोकप्रिय आहेत. विशेषतः तरुणांना या कंपनीच्या स्कूटर खूप आवडतात. दरम्यान कंपनी लवकरच एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार असे वृत्त समोर आले असे.

गेल्या वर्षी, सुझुकीने टोकियो मोटर शोमध्ये ई-बर्गमन इलेक्ट्रिक स्कूटर प्रोटोटाइप सादर केला होता. ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय रस्त्यांवर अनेकदा दिसली आहे जी लवकरच लॉन्च होणार असल्याचे सूचित करते. परंतु ही स्कूटर केव्हा लॉन्च होणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe