स्कूटर या प्रामुख्याने ऑफिस आणि घर किंवा कॉलेज या दरम्यानचा प्रवास करण्यासाठी खूप फायद्याच्या असतात व त्यामुळे बरेच जण ऑफिसला जाण्यासाठी आणि घरातील मुला-मुलींना शाळेत किंवा कॉलेजला जाण्यासाठी स्कूटर विकत घेतात. जर आपण आज बाजारपेठे मधील वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्कूटर च्या किंमत पहिल्या तर त्या ऐंशी हजारापासून ते एक लाख रुपयांपर्यंत आहेत.
परंतु बऱ्याच जणांचा कल हा कमी किमतीत स्कूटर घेण्याचा असतो. त्याचप्रमाणे जर तुमचा कमी किमतीत स्कूटर घेण्याचा विचार असेल तर आपण ऑनलाइन मार्केटच्या माध्यमातून कमी किमतीत चांगले स्कूटर कुठे खरेदी करू शकतात याबद्दलची माहिती घेणार आहोत. तुम्हाला या ऑनलाईन मार्केटच्या माध्यमातून हिरो कंपनीची हिरो मेस्ट्रो एज फक्त 28 हजार रुपयांना मिळू शकते. या लेखामध्ये आपण या स्कूटरची माहिती बघू.
हिरो मेस्ट्रो एज स्कूटरची वैशिष्ट्ये
हिरो मेस्ट्रो एज 125 एक आकर्षक डिझाईन आणि स्टायलिश लुक असलेली स्कूटर असून या स्कूटरची हेडलाइट्स, टेललाईट्स आणि इंडिकेटर सर्व स्पोर्ट डिझाईन सह देण्यात आलेली आहेत. यामध्ये तुम्हाला स्टायलिश अलॉय व्हील आणि क्रोम फिनिशिंग देखील मिळते. विशेष म्हणजे ही स्कूटर आणि आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून यामधून तुम्ही तुमच्या आवडीचा रंग निवडू शकतात.
हिरो मेस्ट्रो एज 125 स्कूटरचे इंजिन
या स्कूटरमध्ये तुम्हाला 124.6c इंधन इंजेक्टेड इंजिन मिळते व हे इंजिन 9.12 पीएस पावर आणि 10.4 एनएम टॉर्क जनरेट करण्यासाठी सक्षम असून या स्कूटरचा वेग आणि कार्यप्रदर्शन शहरातील ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातून खूप चांगले आहे.
या स्कूटरचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या स्कूटरचे उत्कृष्ट मायलेज हे होय. एआरएआय नुसार बघितले तर ही स्कूटर 49 किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देते. म्हणजे तुम्ही या स्कूटरचे टॅंक पूर्ण पेट्रोलने भरली तर तुम्ही लांबचा प्रवास आरामात करू शकता.
रायडिंगसाठी असलेले सुरक्षितता वैशिष्ट्ये
हिरो मेस्ट्रो एज 125 मध्ये तुम्हाला आरामदायी सीट आणि उत्कृष्ट सस्पेन्शन मिळते. यामुळे तुम्ही लांबचा प्रवास देखील केला तरी थकवा येत नाही. या स्कूटरमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि हायड्रोलिक शॉक रियर सस्पेन्शन देण्यात आलेले आहेत. याशिवाय तुमची सुरक्षितता लक्षात घेऊन यात फ्रंट डिस्क ब्रेक किंवा ड्रम ब्रेकचा पर्याय मिळतो. कंपनीने मागच्या बाजूला ड्रम ब्रेक दिलेली आहेत.
या ठिकाणी 28000 मध्ये मिळत आहे ही स्कूटर
जर या स्कूटरची किंमत पाहिली तर ऑनलाईन मार्केट क्विकर वर फक्त 28 हजारमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे ही सेकंड हॅन्ड स्कूटर उपलब्ध असून हिचा लूक आणि डिझाईन देखील उत्तम आहे. 2017 मॉडेलची ही स्कूटर असून आतापर्यंत ती फक्त तीस हजार किलोमीटर चालली आहे. तसेच कंडिशन देखील चांगली असून जर तुम्हाला ही स्कूटर खरेदी करायची असेल तर तुम्ही क्विकर या वेबसाईटच्या माध्यमातून संपर्क करू शकतात.