स्वतःच्या घरासमोर चार चाकी उभी असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते व हे स्वप्न तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. परंतु बऱ्याच कारच्या किमती या काही लाखो रुपयात असल्याने प्रत्येकच व्यक्तीला रोख पैसे देऊन कार घेणे शक्य होत नाही. मग अशावेळी आपल्याकडे फक्त एकच पर्याय उरतो आणि तो म्हणजे बँकेकडून कारसाठी लोन घेणे हे होय.
आता बऱ्याच बँकेच्या माध्यमातून व्हेईकल लोन म्हणजेच वाहन कर्ज मिळणे अगदी सोपे झाले असल्याकारणाने काही अटी पूर्ण केल्यानंतर बँकेकडून कार लोन मिळते. परंतु हे लोन मंजूर झाल्यानंतर देखील आपल्याला काही रक्कम स्वतः टाकावी लागते व त्यालाच आपण डाऊन पेमेंट म्हणतो.
अशाप्रकारे बँकेचे कर्ज आणि आपल्या जवळची काही रक्कम डाऊन पेमेंट म्हणून भरली की आपले कारचे स्वप्न पूर्ण होते. अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील कार घ्यायची असेल आणि तीही हुंदाई कंपनीची तर तुम्ही ह्युंदाई एक्स्टर EX चे बेस व्हेरियंट खरेदी करू शकतात
व याकरिता तुम्हाला दोन लाख रुपयांचे डाऊन पेमेंट करणे गरजेचे आहे. समजा तुम्ही ही कार घेण्यासाठी दोन लाख रुपये डाऊन पेमेंट केले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती ईएमआय भरावा लागेल? याबद्दलचीच माहिती या लेखात घेऊ.
किती आहे Hyundai Exter च्या कारची किंमत?
Hyundai या कंपनीने Exter EX चे बेस व्हेरिएंट भारतीय बाजारामध्ये सात लाख 69 हजार रुपयांच्या एक्स शोरूम किमतीमध्ये ऑफर केले असून हे व्हेरियंट जर तुम्ही दिल्लीमध्ये खरेदी केली
तर त्याची किंमत आरटीओ म्हणून 27 हजार रुपये असेल व या खर्चाशिवाय स्मार्ट कार्ड तसेच एमसीडी चार्ज, फास्टटॅग करता तुम्हाला दोन हजार रुपये द्यावे लागतात व त्यानंतर या कारची किंमत आठ लाख 50 हजार रुपये होते.
दोन लाख रुपये डाऊन पेमेंट केले तर किती भरावा लागेल ईएमआय?
जर तुम्ही या कारचे बेस व्हेरियंट EX खरेदी केले तर फायनान्स फक्त एक्स शोरूम किमतीवरच केला जाईल व तुम्हाला बँकेकडून साधारणपणे पाच लाख 69 हजार रुपये मिळतील. समजा तुम्ही बँकेकडून पाच वर्षाकरिता 9.8 टक्के व्याजासह हे कर्ज घेतले तर तुम्हाला पुढील सात वर्षांकरिता प्रत्येक महिन्याला 12,256 चा ईएमआय भरावा लागेल.