सोने-चांदी परत एकदा सुसाट! सोने पोहोचले 75 हजार 500 रुपयांच्या पुढे; जूनपर्यंत सोन्याचे भाव होतील 85 हजार रुपये तोळे?

सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मागील काही दिवसां अगोदर काहीशी घसरण पाहायला मिळाली होती. अमेरिकेत पार पडलेल्या निवडणुकीच्या नंतर साधारणपणे ही घसरण पाहायला मिळत होती.परंतु सोने चांदीच्या दराने परत एकदा सुसाट वेग पकडला असून आज म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे.

gold rate

Gold-Silver Rate Today:- सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मागील काही दिवसां अगोदर काहीशी घसरण पाहायला मिळाली होती. अमेरिकेत पार पडलेल्या निवडणुकीच्या नंतर साधारणपणे ही घसरण पाहायला मिळत होती.परंतु सोने चांदीच्या दराने परत एकदा सुसाट वेग पकडला असून आज म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे.

जर आपण इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार बघितले तर आज 24 कॅरेट दहा ग्राम म्हणजेच एक तोळा सोन्यामागे 732 रुपयांची वाढ झाली.म्हणजेच कालची किंमत ७४ हजार 808 रुपये प्रति दहा ग्राम होती.तर ती आज 75 हजार 540 रुपये इतकी झाली.

तीच गत चांदीची देखील आज दिसून येत असून चांदीच्या दरात देखील प्रति किलो 1554 रुपयांनी वाढ होऊन चांदी तब्बल 90 हजार 843 रुपयांवर पोहोचली. यावरून आपल्याला दिसून येते की,सोने आणि चांदीच्या दरात परत एकदा वाढ व्हायला लागली आहे.

कसे आहेत आजचे देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे भाव?

1- दिल्लीमध्ये दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याची किंमत 70800 रुपये आहे तर दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार दोनशे वीस रुपये आहे.

2- मुंबईमध्ये 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम म्हणजेच एक तोळा सोन्याची किंमत 70650 रुपये तर 24 कॅरेटच्या दहा ग्राम सोन्याची किंमत 77 हजार 70 रुपये इतकी आहे.

3- कोलकाता येथे 22 कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅम ची किंमत 70650 तर दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार 70 रुपये इतकी आहे.

4- चेन्नई- चेन्नई येथे दहा ग्राम 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,650 तर 24 कॅरेटच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत 77 हजार 70 रुपये इतकी आहे.

5- भोपाळ- भोपाळ दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 70700 रुपये असून दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,120 रुपये इतकी आहे.

पुढील वर्षी जूनपर्यंत सोन्याचे दर जाऊ शकतात 85 हजार रुपया पर्यंत?
केडिया ॲडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांच्या मते मोठ्या तेजी नंतर सोन्यामध्ये घसरण होणे गरजेचे होते. ती आधीच आली आहे. त्यामुळे प्रति दहा ग्रॅमची किंमत 74 हजार रुपयांच्या खाली येण्याची शक्यता आता तरी नाही.

अमेरिकेने व्याजदरात कपात केल्यानंतर ब्रिटनने देखील व्याजदरात कपात केली असल्याने गोल्ड ईटीएफची खरेदी वाढली आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे पुढील वर्षी 30 जून पर्यंत सोने 85 हजार रुपये प्रति दहा ग्राम पर्यंत पोहोचू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe