Gold-Silver Rate:- गेल्या काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. सध्या सणांचा कालावधी सुरू असून येत्या काही दिवसांमध्ये दिवाळी सारख्या महत्त्वाचा सण येऊ घातला आहे. भारतातील हा सण महत्त्वाचा असून या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोने व चांदीची खरेदी लोकांकडून केली जाते.
परंतु याच कालावधीमध्ये जर आपण विचार केला तर कित्येक दिवसापासून सोने-चांदीच्या दरामध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी दिवाळीत सोने चांदी खरेदी करणाऱ्यांना आर्थिक झटका बसेल की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. कारण देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोने चांदीच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे व त्यासोबतच मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर देखील सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आलेली आहे.
सोने–चांदीच्या दरात किती झाली वाढ?
याबाबत विचार केला तर आज सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सोन्याचा जो काही वायदा बाजार होता तो 60478 रुपये प्रति दहा ग्रॅम वर उघडला व यामध्ये किंचितशी वाढ नोंदवण्यात आली. म्हणजेच मागील काही ट्रेडिंग दिवसांचा विचार केला तर त्या तुलनेमध्ये सोन्याच्या दरात 17 रुपयांची म्हणजे 0.03% ची वाढ नोंदवण्यात आली आहे.
सोन्याचा दर हा 60554 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. तसेच चांदीचा भावाचा विचार केला तर वायदे बाजारामध्ये चांदीचा भाव देखील तेजीत असून आज सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये चांदी ७१,६२९ रुपये प्रति किलोच्या पातळीवर उघडला व त्यानंतर यामध्ये किंचितशी वाढ नोंदवण्यात आली. कालच्या तुलनेत 154 पैसे म्हणजे 0.02% वाढ होऊन चांदीचे दर 71,800 रुपयांवर पोहोचले आहेत.
देशातील प्रमुख शहरांमधील आजचे सोन्याचे दर
1- दिल्ली–आज राजधानी दिल्लीचा विचार केला तर या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा दर 61 हजार आठशे रुपये होता. तर चांदीचा दर हा 75 हजार 100 रुपये प्रति किलो इतका होता.
2- मुंबई– भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी आज 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 61 हजार आठशे रुपये आहे तर चांदी 75 हजार 100 रुपये प्रति किलो आहे.
3- कोलकाता– या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा दर 61 हजार आठशे रुपये तर चांदी 75 हजार 100 रुपये प्रति किलो इतकी आहे.
4- चेन्नई– या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा दर 61 हजार 690 रुपये तर चांदी 77 हजार पाचशे रुपये प्रति किलो इतकी आहे.
5- लखनऊ– या ठिकाणी 24 कॅरेट सोने 61 हजार 950 रुपये तर चांदी 75 हजार 100 रुपये प्रति किलो इतके आहे.
6- गुरुग्राम– या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा दर 61 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम तर चांदी 75 हजार 100 रुपये प्रति किलो इतकी आहे.
7- पुणे– महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात आज 24 कॅरेट सोन्याचा दर 61 हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅम तर चांदीचा दर 75 हजार 100 रुपये प्रति किलो इतका आहे.
8- जयपुर– या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा दर 61 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम तर चांदी 75 हजार 100 रुपये प्रति किलो आहे.
9- गाजियाबाद– या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा दर 61,950 रुपये प्रति दहा ग्राम तर चांदी 75 हजार 100 रुपये प्रति किलो इतकी आहे.