Gold-Silver Rate Today:- दोन दिवसावर दसरा येऊन ठेपला असून काही दिवसांनी दिवाळी सारखा महत्त्वाचा सण येऊ घातला आहे. या सणासुदीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. परंतु सध्या जर सोन्या चांदीच्या दरांचा विचार केला तर गेल्या चार दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये साधारणपणे 1800 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे व चांदीने देखील 1200 रुपयांपर्यंत वाढ नोंदवली आहे.
जर आपण सोमवार आणि मंगळवारचा विचार केला तर या कालावधीत सोन्याच्या दरात घसरण झालेली होती.परंतु त्यानंतर मात्र सोन्याने उच्चांकी पातळी गाठली.18 ऑक्टोबरला सोन्याच्या दरात 540 रुपयांनी वाढ झाली होती तर 19 ऑक्टोबरला 270 रुपये आणि 20 ऑक्टोबर रोजी 780 रुपयांची वाढ झाली आहे.

21 ऑक्टोबरला सोन्यात 210 रुपयांची तेजी आली होती. तीच परिस्थितीत चांदीची देखील असून 18 तारखेला 1000 रुपयांची वाढ चांदीच्या दरात झाली होती तर 19 ऑक्टोबरला पाचशे रुपयांची घसरण पाहायला मिळाली. परंतु 21 ऑक्टोबर रोजी बाराशे रुपयांनी चांदीचे दर वधारले होते.
काय आहेत आजचे सोने आणि चांदीचे दर?
1- 24 कॅरेट सोन्याचे दर– आज 24 कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅम म्हणजेच एक तोळ्याचे दर हे 61 हजार 750 रुपये इतके आहेत. म्हणजेच एक ग्रॅम 24 कॅरेट सोने खरेदीसाठी आज 6175 रुपये इतके पैसे मोजावे लागतील व आठ ग्रॅम 24 कॅरेट सोन्याकरिता 49 हजार 400 रुपये इतका खर्च येईल.
2- 22 कॅरेट सोन्याचे दर– 22 कॅरेट सोन्याचे आजचे दहा ग्रॅम म्हणजेच एक तोळ्याचे दर हे 56 हजार सहाशे रुपये इतके आहेत. म्हणजेच एक ग्रॅम 22 कॅरेट सोने खरेदी करिता आज पाच हजार सहाशे साठ रुपये मोजावे लागतील व आठ ग्रॅम 22 कॅरेट सोने खरेदी करिता 45 हजार 280 रुपये इतका खर्च येईल.
3- चांदीचे आजचे दर– चांदीचे आजचे दर पाहिले तर एक किलोग्रॅम चांदीची किंमत आज 75 हजार 300 रुपये इतकी आहे. म्हणजेच 100 ग्रॅम चांदी खरेदी करायचे असेल तर आज 7530 रुपये इतका खर्च येईल तर एक ग्रॅम चांदी खरेदी करण्याकरिता 75.3 रुपये इतका खर्च येईल तर आठ ग्रॅम चांदी खरेदी करायचे असेल तर 602.4 रुपये इतका खर्च येईल.