सध्या प्रत्येकजण महागाईशी झगडतोय. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यातच भाजीपाला, फळे यांच्या किमती रेकॉर्डब्रेक झाल्या. टोमॅटो, कांदा यांनी पन्नाशी ओलांडली. यामुळे गृहिणींचा देखील बजेट कोलमडलं. परंतु आता नववर्षात जानेवारीत भाजीपाला, फळे ६० टक्क्यांपेक्षा किमती कमी होतील.
निर्देशांकाच्या विश्लेषणानुसार, जानेवारीत अनेक फळे, भाजपा यांच्या किमती घसरतील. अगदी डाळिंब जरी आपण पहिले तर ते जानेवारीत १३१ रुपये प्रति किलोपर्यंत येईल, सध्या ते सरासरी २०० रुपये किलो दराने विकले जात आहे. टोमॅटोची विक्री दोन महिन्यांपूर्वी १०० रुपये किलोने झाली. अद्यापही टोमॅटो गरमच आहे. परंतु हा टोमॅटोदेखील जानेवारीत २५ रुपयांपर्यंत घसरेल.

कांदा, बटाटा देखील उतरणार
आताच्याच कॅल्क्युलेशननुसार उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल येथे बटाट्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळतेय. नवीन बटाटा मार्केटमध्ये आला आणि जुन्या बटाट्याचा भाव ८ ते १० रुपये किलोपर्यंत घसरला.
नवीन बटाट्याचे दरही ३५ रुपयांवर आले. त्याआधी हा ५० रुपये किलोने विकला जात होता. पंधरा दिवसापूर्वी ६० रुपये किलोच्या वर गेलेला कांदा आता ४० वर आला आहे. जानेवारीत कांदा देखील अगदी कमी किमतीत मिळेल अशी अपेक्षा आहे.
या फळांच्या किमतीत तेजी येण्याची शक्यता
सफरचंद, किवी आणि नाशपाती ही फळे मात्र तेजीत येऊ शकतात असा अंदाज आहे. साधारण सध्या १३० रुपये किलो दराने येणारे सफरचंद १८० रुपयांपर्यंत जातील असा अंदाज आहे. किवी हे फळ देखील ६५ रुपयांवरून ९६ रुपयांपर्यंत वाढू शकते. नाशपाती जानेवारीत १८२ रुपये किलोपर्यंत जाईल असा अंदाज आहे.
कही ख़ुशी कही गम
हे मार्केट घासल्याने सर्वसामान्य लोकांचे बजेट सुधारेल. पैशांची बचत होईल. त्यामुळे जनसाम्यांचे वातावरण चांगले असेल. परंतु शेतकऱ्यांसह गणित मात्र कोलमडेल. अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड देत आलेला माल मातीमोल होऊ नये इतकीच इच्छा.