Kapus Bajarbhav : यावर्षी एक ऑक्टोबर पासून कापसाचा हंगाम सुरू झाला आहे. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला म्हणजे मुहूर्ताच्या कापसाला 11000 रुपये प्रति क्विंटर पर्यंत बाजार भाव मिळाला होता. त्यामुळे यावर्षी कापसाला चांगला विक्रमी बाजारभाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती.
मात्र शेतकऱ्यांची ही आशा या हंगामात फोल ठरली आहे. त्याच्या कापसाला चांगला बाजार भाव मिळाल्यानंतर कापसाच्या बाजारभावात घसरण झाली. मात्र आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. गेल्या पाच दिवसांपासून कापसाच्या दरात रोजाना वाढ होत आहे.
गेल्या पाच दिवसात कापसाच्या दरात तब्बल सहाशे रुपयांची वाढ झाली आहे. आज कापूस दरात देशांतर्गत 200 रुपयांची वाढ नमूद करण्यात आली आहे. आता कापसाला सरासरी साडेआठ हजार रुपये हुन अधिक बाजार भाव मिळत आहे. मात्र असे असले तरी राज्यात अजूनही शेतकरी बांधव कापूस मोठ्या प्रमाणात विक्री करत नसल्याचे चित्र आहे. सध्या बाजारात कापसाची आवक नगण्य होत आहे.
दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, बाजारात कापसाची आवक कमी झाली असल्याने तसेच सुताला उठाव मिळत असल्याने कापूस दरात वाढ होत आहे. खरं पाहता गेल्या आठवड्यात कापसाला किमान बाजार भाव 6000 रुपये मिळत होता आणि कमाल बाजार भाव 8 हजार रुपये मिळत होता. मात्र आता बाजारातील हे चित्र बदलले असून कापूस दरात वाढ होत कापसाला किमान बाजार भाव सात हजार रुपये प्रति क्विंटल आणि कमाल बाजार भाव 9000 रुपये प्रति क्विंटल मिळत आहे.
मित्रांनो आज आपल्या राज्यात कापसाला आठ हजार रुपये प्रति क्विंटल ते नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळाला आहे. मात्र असे असले तरी अजूनही बाजारात कापसाची आवक कमीच आहे. मित्रांनो खरं पाहता सूत मागणी वाढली असल्याने तसेच सोया पेंडला अधिक दर मिळत असल्याने सरकी पेंड ची मागणी वाढली असल्याने कापसाच्या बाजारभावात वाढ होत आहे.
दरम्यान आता बाजारात कापसाची आवक कमी झाली असल्याने मागणीनुसार पुरवठा होणार नाही म्हणून कापूस दरात अजून वाढ होणार आहे. कापसाला येत्या काही दिवसात 9000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव मिळणार असल्याचे जाणकारांनी नमूद केले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी 9000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव गृहीत धरून कापसाची विक्री टप्प्याटप्प्याने करत राहणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.