Maharashtra Onion Rate : कांद्याच्या दरात गेल्या आठवड्यापासून सातत्याने घसरण होत आहे. यावर्षी एप्रिल महिन्यापासून ते जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत शेतकऱ्यांनी कांदा अतिशय कवडीमोल दरात विकला होता. ऑक्टोबर मध्ये मात्र कांदा दरात थोडीशी वाढ झाली.
संपूर्ण महिना कांदादरातील वाढ कायम होती अन नोव्हेंबरच्या सुरुवातीला कांदा दरात अतिशय विक्रमी आणि या हंगामातील सर्वोच्च बाजारभावाची नोंद झाली. 15 नोव्हेंबर पर्यंत राज्यात 2500 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा कांद्याला सरासरी दर मिळत होता आणि अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा 3500 प्रतिक्विंटल पर्यंतच्या कमाल बाजारभावात विकला गेला. साहजिकच यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत होता.
मात्र गेल्या आठ दिवसांपासून कांदा दरात मोठी घसरगुंडी झाली आहे. कांदा आठ दिवसातच शिखरावरून जमिनीवर आला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही कांदा दरात घसरण झाली आहे. जिल्ह्यातील नेवासा तालुक्याच्या घोडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठ दिवसात कांदा एक हजार रुपयांपेक्षा अधिक घसरला आहे.
घोडेगाव एपीएमसी मध्ये 21 नोव्हेंबर रोजी 225 ट्रक एवढी कांद्याची आवक झाली. या वाहनातून 41,803 कोणी कांदा आवक झाली होती. यामध्ये उन्हाळी कांद्याचे अधिक प्रमाण होते. नवीन लाल कांदा आवक अजूनही कमीच आहे. नवीन लाल कांद्याची मात्र तीनशे गोणी आवक होती. नवीन लाल कांद्याला या एपीएमसी मध्ये पाचशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंतचा बाजार भाव मिळाला.
उन्हाळी कांद्याला दोनशे रुपये प्रति क्विंटर ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. एखाद-दोन शेतकऱ्यांना 2100 ते 2200 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे दर मिळाला आहे. खरं पाहता दक्षिणेकडील राज्यात नवीन लाल कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्रातील सोलापूर एपीएमसी मध्ये देखील 30 ट्रक एवढा नवीन कांदा आवक होत आहे.
तसेच आता नोव्हेंबर महिना उचलला असला तरी देखील जुना कांदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे बाकी आहे. महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेश मध्ये सर्वाधिक जुना कांदा पाहायला मिळत आहे. एकीकडे शेतकऱ्यांकडे जुना कांदा साठा उपलब्ध आहे तर नवीन कांदा देखील शेतकऱ्यांच्या पदरात येत आहे मात्र कांद्याला मागणी कमी झाली आहे.
दक्षिणकडील राज्यांमधून कांद्याला मागणी नगणने असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दक्षिण भागातील राज्यांमधून कांद्याची मागणी कमी झाली असल्याने कांदा दरात घसरण होत असल्याचे बाजारभाव अभ्यासक विशेषज्ञ यांनी नमूद केले आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.