Maharashtra Soybean Market : यंदा शासनाने सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव लावून दिला आहे. सध्या सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. सोयाबीन जवळपास साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास विक्री होत आहे. म्हणजेच हमीभावापेक्षा एक हजार रुपये अधिक दर.
मात्र असे असताना देखील सोयाबीन उत्पादक अडचणीत आहेत. सध्या मिळत असलेला दर त्यांच्यासाठी परवडणारा नसल्याचे सांगितले जात आहे. खरं पाहता खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून हवामानात सातत्याने बदल झाला असल्याने याचा विपरीत परिणाम पिकावर झाला होता. त्यामुळे सोयाबीनवर किटकाचा आणि रोगांचा अधिक प्रभाव पाहायला मिळाला.
परिणामी पिक जोपासण्यासाठी अधिक खर्च करावा लागला. खर्च अधिक झाला मात्र उत्पादन कमी मिळाले. त्यामुळे हमीभावापेक्षा सध्या अधिक दर मिळत असला तरी देखील उत्पादनात झालेली घट भरून काढण्यासाठी यापेक्षाही अधिक बाजार भाव शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. उत्पादक शेतकऱ्यांच्या मते त्यांना जवळपास 7000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दर अपेक्षित आहे.
मात्र तूर्तास बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलवरच फिरत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक गोची होत आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिलावाची माहिती जाणून घेणार आहोत जेणेकरून सध्या सोयाबीनला प्रमुख बाजार समितीमध्ये काय दर मिळत आहे याची माहिती आपणास होऊ शकेल.
कांरजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 5000 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4975 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5465 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5225 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1013 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4550 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5350 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5150 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 6000 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावा त्या मार्केटमध्ये सोयाबीन 4750 रुपये प्रत्येक प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 6001 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मुरुड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये आज 296 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4750 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5499 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5124 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 678 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5499 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5340 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 571 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5345 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5172 प्रतिक गुंतला एवढा नमूद करण्यात आला आहे.
केज कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये हे मात्र कोणत्या पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5381 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5400 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 175 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लीलावत या मार्केटमध्ये सोयाबीनला 4900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5410 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.