Maize Rate : शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन…! यावर्षी मक्याला मिळणार अधिक बाजारभाव, ‘हे’ राहणार भाव वाढीचे कारणे

Ajay Patil
Published:

Maize Rate : मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे गत हंगामात सोयाबीन आणि कापूस या दोन खरीप हंगामातील (Kharif Season) मुख्य पिकांना कधी नव्हे तो उच्चांकी बाजार भाव मिळाला. यामुळे या वर्षी राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांनी (Farmer) सोयाबीन आणि कापूस लागवडिकडे आपला मोर्चा वळवला होता.

मात्र यावर्षी सोयाबीनला अपेक्षित असा बाजार भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. सध्या सोयाबीन पाच हजार रुपये प्रति क्‍विंटल दराने विक्री होत असून अनेक ठिकाणी सोयाबीनचे दर पाच हजाराहून खाली आहेत. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची घोर निराशा होत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान बाजारात नव्याने दाखल झालेला मका (Maize Crop) आता चांगलाच भाव खात असल्याचे चित्र आहे.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारात सध्या नव्याने दाखल झालेला मका हा ओला असून देखील त्याला 2200 ते 2300 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव (Maize Market Price) मिळत आहे. अशा परिस्थितीत मका उत्पादक शेतकरी बांधवांना याचा फायदा होत असल्याचे जाणकार नमूद करत आहेत.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की मक्याचा हंगाम अजून एक महिन्याभरानंतर सुरू होणार आहे. जेव्हा मक्याचा हंगाम सुरू होईल त्यावेळी देखील भाव टिकून राहणार असल्याचे व्यापारी वर्गाकडून नमूद केले जात आहे.

व्यापारी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी मक्‍याच्या हंगामात मक्याला अठराशे ते 2000 रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी बाजार भाव (Maize Bajarbhav) कायम राहणार आहे. यामुळे या हंगामात मका उत्पादक शेतकरी बांधवांना अच्छे दिन येणार असल्याचे सांगितले जात आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, खरीप हंगामात आपल्या राज्यात मका या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती (Maize Farming) केली जाते. मात्र गतवर्षी सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळाला असल्याने यावर्षी अनेक मका उत्पादक शेतकरी बांधवांनी मका ऐवजी सोयाबीन पिकाला पसंती दर्शवली आहे.

शिवाय या वर्षी मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टी सारख्या पावसामुळे मका पिकाला देखील मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मक्याच्या उत्पादनात कमालीची घट घडून येणार असल्याचा अंदाज जाणकार लोकांनी वर्तवला आहे. दरम्यान आता राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये नवीन मका दाखल होत असून त्याला 2200 ते 2300 रुपये प्रतिक्विंटल असा बाजार भाव मिळतं आहे. मक्याचा हंगाम सुरू झाल्यानंतर देखील भाव टिकून राहणार असल्याची आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली असल्याने मका उत्पादक शेतकरी बांधवांच्या भुवया पुन्हा एकदा उंचावल्या आहेत.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश हरियाणा आणि पंजाब या राज्यांमध्ये सध्या मका उपलब्ध नसल्यामुळे मग त्याला चांगली मागणी आहे आणि बाजार भाव देखील टिकून राहिले आहेत. दरम्यान व्यापारी वर्गाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी मका लागवडीखालील क्षेत्र घटले असल्याने आणि मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि हवामान बदलामुळे मग त्याच्या उत्पादनात घट होणार असल्याने मक्‍याला चांगला बाजार भाव मिळणार आहे. तज्ञ लोकांच्या मते या वर्षी मका उत्पादनात जवळपास 18 टक्के घट येऊ शकते. यामुळे मक्याला हंगामात देखील चांगला बाजार भाव मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe