कांदा करतोय वांदा ! कांद्याला मिळतोय मात्र 650 चा भाव ; बळीराजा संकटात

Ajay Patil
Published:

Onion Market Maharashtra : कांदा उत्पादक शेतकरी बांधव केल्या काही दिवसांपासून मोठ्या संकटात सापडले आहेत. खरं पाहता, ऑक्टोबर महिन्यापासून कांदा दरात सुधारणा झाली होती.

सुधारलेले दर नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या पंधरवड्यापर्यंत कायम राहिले. नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी दर मिळत होता. कमाल बाजार भाव तर साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल वर पोहचला होता.

मात्र दुसऱ्या पंधरवड्यापासून कांदा दरात घसरण झाली. आता गेल्या दहा दिवसांपासून कांदा एक हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमी दरात विक्री होत आहे. आज देखील राज्यातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दर मिळाला आहे.

दोन-तीन कृषी उत्पन्न बाजार समित्या तर अशा होत्या जिथे कांद्याला मात्र साडेसहाशे रुपये प्रति क्विंटल ते 700 रुपये प्रति क्विंटल असा सरासरी दर मिळाला आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख एपीएमसी मधील कांदा दराचीं थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 6238 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 700 रुपये किमान बाजार भाव मिळाला असून 2100 रुपये एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1400 रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1479 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 150 रुपये एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 1000 रुपये एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 575 रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 27201 क्विंटल लाल कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला शंभर रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान, 2200 रुपये प्रति क्विंटल कमाल आणि बाराशे रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी दर मिळाला आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजारात आज 1332 क्विंटल लाल कांदा आवक झाली. या एपीएमसी मध्ये आज कांद्याला 786 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 2151 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 1951 प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.

सांगली फळे भाजीपाला मार्केट :- या मार्केटमध्ये आज पाच हजार 21 क्विंटल लोकल कांदा आवक झाली. आज या मार्केटमध्ये कांद्याला चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 1100 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :– या मार्केटमध्ये आज 3835 क्विंटल पोळ कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार अठराशे रुपये नमूद झाला आहे.

येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :– या मार्केटमध्ये आज चार हजार क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला दोनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1270 रुपये प्रति क्विंटर एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव साडेसातशे रुपये नमूद झाला आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या मार्केटमध्ये आज तीन हजार 372 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1275 रुपये प्रतिक गुंतले एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1060 रुपये नमूद झाला आहे.

राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या मार्केटमध्ये आज 7143 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा कीमान, 1600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :– या मार्केटमध्ये आज 6,780 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान, 1651 प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 1100 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :- या मार्केटमध्ये आज 4200 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1250 नमूद झाला आहे.

पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या मार्केटमध्ये आज 355 क्विंटल लोकल कांदा आवक झाली. आज या मार्केटमध्ये कांद्याला किमान दर 300, कमाल दर 1000 आणि सरासरी दर 650 नमूद झाला आहे.

साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती :- या मार्केटमध्ये आज 6350 क्विंटल लाल कांदा आवक झाली. आज झालेल्या लीलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, एक हजार 55 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि सरासरी दर 700 रुपये नमूद झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe