Soybean Bajar Bhav : सध्या सोयाबीन बाजार भाव (Soybean Rate) आहेत गेल्या चार-पाच दिवसांपासून कमालीची स्थिरता पाहायला मिळत आहे. सोयाबीनला (Soybean Crop) सध्या पाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी बाजारभाव (Soybean Market Price) मिळत आहे. अशा परिस्थितीत यंदा सोयाबीन बाजार भावात तेजी येईल की नाही हा मोठा प्रश्न सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना (Soybean Grower Farmer) पुढे उभा झाला आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार किमान दोन महिने सोयाबीन बाजारभाव पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपासच राहणार आहेत. तसेच दोन महिन्यानंतर सोयाबीन बाजारभावात तेजी येईल की बाजार भाव अजून पडतील हे स्पष्टपणे सांगता येणार असल्याचे जाणकार लोक नमूद करत आहेत.

अशा परिस्थितीत बाजारपेठेतील चित्र पाहून शेतकरी बांधवांनी (Farmer) सोयाबीनची विक्री करणे आवश्यक राहणार आहे. दरम्यान आपण रोजच सोयाबीन बाजारभावाची माहिती जाणून घेतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाची चर्चा करणार आहोत.
कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- कारंजा एपीएमसीमध्ये आज तीन हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 525 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- राहता एपीएमसीमध्ये आज 30 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनला चार हजार 286 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4901 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4351 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 2540 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 725 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 290 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 480 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार एक रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 740 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज मेहकर एपीएमसीमध्ये 990 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 700 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- लातूर एपीएमसीमध्ये आज सहा हजार 995 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 630 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5231 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 971 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 900 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 219 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4870 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4585 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 249 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 947 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4523 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या एपीएमसीमध्ये दोन हजार 400 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- मलकापूर एपीएमसीमध्ये आज 220 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4075 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 35 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.