Soybean Bajar Bhav : सोयाबीन दर साडे पाच हजारावर ! सोयाबीनचे भाव वाढणार ? वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

Ajay Patil
Published:
soybean bajarbhav

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारभावात (Soybean Rate) हंगाम सुरू झाल्यापासून घसरण होत आहे. नवीन सोयाबीन बाजारात दाखल झाल्यानंतर सोयाबीन दरातील (Soybean Market Price) घसरण अजूनच वाढली. सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या (Soybean Grower Farmer) मते, नवीन सोयाबीनमध्ये आद्रता अधिक असल्याचे कारण पुढे करत व्यापारी सोयाबीनचे बाजारभाव हाणून पाडत आहेत.

दरम्यान, राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Apmc) हमीभावापेक्षा (Soybean MSP) कमी किमान बाजार भाव मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची आर्थिक कोंडी होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत नाफेड करून सोयाबीन खरेदी होणे अपेक्षित असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.

मात्र अजून नाफेडने सोयाबीन विक्रीसाठी आवश्यक असलेली नोंदणी प्रक्रिया राबवलेले नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्यात रोष बघायला मिळत आहे. दरम्यान जाणकार लोकांच्या मते या वर्षी नाफेड सोयाबीन मधील आद्रता कमी झाल्यानंतर सोयाबीन खरेदी करण्यास सुरुवात करणार आहे. त्यामुळे जोपर्यंत नाफेड खरेदी करण्यासाठी बाजारात उतरत नाहीत तोपर्यंत सोयाबीन बाजार भावात वाढ होणे कठीण असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच आता नाफेडच सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना तारणार आहे.

नाफेडने सोयाबीन खरेदी करण्यास सुरुवात केली तर सोयाबीन बाजार भावाच्या घसरलेल्या किमतीवर अंकुश लावला जाणार आहे. सोयाबीन बाजारभाव पुन्हा एकदा पूर्वपदावर येण्याची शक्यता यामुळे वाढणार आहे. दरम्यान आज राज्यातील काही बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार दोनशे ते पाच हजार 300 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल बाजार भाव मिळाला आहे. त्यामुळे भविष्यात सोयाबीनचे बाजार भाव वाढण्याचे हे चिन्ह आहे का असा सवाल शेतकऱ्यांचा आहे.

जाणकार लोकांच्या मते, दोन-तीन महिने सोयाबीन बाजार भाव असेच कायम राहणार आहेत. मित्रांनो आपण रोजच सोयाबीन बाजार भावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण सोयाबीन बाजारभावाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजार भाव सविस्तर.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 110 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 850 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 700 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती :- मराठवाड्यातील औरंगाबाद एपीएमसीमध्ये आज 108 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 947 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 299 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4651 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- माजलगाव एपीएमसीमध्ये आज 1328 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4728 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4500 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 187 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4985 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोयाबीन लिलावासाठी विशेष ओळखली जाणारी उदगीर एपीएमसीमध्ये आज 1932 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 120 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 85 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज पाच हजार क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 925 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5065 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 550 रुपये नमूद करण्यात आला आहे.

राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 109 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4151 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 451 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 334 क्‍विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 85 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 705 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज सात हजार आठ क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 450 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 900 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4499 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 40 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4769 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोयाबीन लिलावासाठी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय बाजार समिती म्हणजेच लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 8099 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4700 रुपये प्रति तुमच्या एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 175 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 50 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसी मध्ये आज 2507 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 250 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4250 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- यवतमाळ एपीएमसीमध्ये आज 456 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 895 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 697 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 935 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4500 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

बीड कृषी उत्पन्न बाजार समिती :- बीड एपीएमसीमध्ये आज 206 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 856 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4427 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 3600 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5 हजार 273 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 623 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 859 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव तीन हजार 980 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 2175 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 270 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe