Soybean Bajarbhav : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणारे एक मुख्य नगदी पीक आहे. सोयाबीन पिकाची संपूर्ण भारत वर्षात शेती केली जाते. देशात मध्य प्रदेश राज्यात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. अर्थातच सोयाबीन पिकांवर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. शिवाय गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला समाधानकारक बाजार भाव मिळाला असल्याने यावर्षी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.
मात्र, यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीन बाजार भाव दबावत आहेत. गेल्यावर्षी मुहूर्ताच्या सोयाबीनला 11 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव होता. मात्र यावर्षी महुर्ताच्या सोयाबीनला देखील चांगला बाजार भाव मिळालेला नाही. गेल्या वर्षी देखील सोयाबीन बाजार भावात चढ-उतार झाली होती. मात्र गेल्या वर्षी संपूर्ण हंगामभर सोयाबीन 6000 रुपये प्रति क्विंटल ते 7000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होत होता. दरम्यान यावर्षी सोयाबीनला मात्र 5000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव मिळत आहे.
निश्चितच यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची डोकेदुखी वाढत आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने सोयाबीन तसेच सोयातेलवरील स्टॉक लिमिट काढून टाकले आहे. त्यामुळे याचा सोयाबीन बाजारावर सकारात्मक परिणाम होणार असून सोयाबीन दरात वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान स्टॉक लिमिट काढली तेव्हापासून सोयाबीन बाजारभावात रोजाना वाढ होत आहे.
गुरुवारी झालेल्या लिलावात सोयाबीन लिलावासाठी विशेष प्रसिद्ध लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 5610 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. निश्चितच गेल्या काही दिवसांच्या तुलनेत गुरुवारी मिळालेला हा बाजार भाव विक्रमी बाजार भाव ठरला आहे. केंद्र शासनाने स्टॉक लिमिट काढल्यानंतर रोजाना बाजारभावात वाढ होत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, सोयाबीन पेरणी पासून ते बाजारात विक्रीला नेण्यापर्यंत एकरी पंचवीस हजार रुपयांचा खर्च त्यांना येत आहे.
मात्र एका एकरातून शेतकरी बांधवांना अवघा चार ते पाच क्विंटल सोयाबीन हाताशी येत आहे. अशा परिस्थितीत सध्या सोयाबीनला 4000 रुपये प्रति क्विंटल ते साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. सरासरी बाजार भाव 5000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे. म्हणजे एका एकरातून शेतकरी बांधवांना अवघ 25 हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळत आहे. आता सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना एकरी पंचवीस हजार रुपयांपर्यंतचा उत्पादन खर्च सोयाबीन पिकासाठी येत असून उत्पन्न देखील तेवढेच मिळत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव तोट्यात जात आहेत.
त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना सोयाबीन दरात वाढ होण्याची आशा आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाने स्टॉक लिमिट काढल्यानंतर सोयाबीन बाजारभावात सुधारणा होण्याचे चित्र आहे. पुढील हप्त्यापासून सोयाबीन बाजारभावात अजून वाढ होण्याची शक्यता जाणकार लोकांकडून वर्तवण्यात आली आहे.