Soybean Bajarbhav : सोयाबीन हे खरीप हंगामात उत्पादित केले जाणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. शिवाय गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळाला असल्याने यावर्षी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रात कमालीची वाढ झाली असल्याचे नमूद केले जात आहे. दरम्यान सध्या सोयाबीन काढणी प्रगतीपथावर असून आता बहुतांशी शेतकरी बांधवांच्या काढणी झालेल्या सोयाबीनमधील ओलावा देखील कमी झाला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे बाजार भाव वधारत आहेत.
मात्र असे असले तरी देशांतर्गत सोयाबीनचे बाजार भाव कमी आहेत. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची आर्थिक कोंडी होत आहे. दरम्यान आता सोयाबीन बाजारभावात वाढ होण्याचे चिन्ह आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की केंद्र शासनाने खाद्यतेल आणि तेल बियांवरील असलेले स्टॉक लिमिट काढून घेतले आहे. यामुळे सोयाबीन बाजारात तेजी येणार असल्याचे जाणकार नमूद करत आहेत. मित्रांनो खरं पाहता मध्यंतरी खाद्यतेलाच्या किमती वाढल्या होत्या.
त्यामुळे केंद्र शासनाने गेल्या वर्षी खाद्यतेल आणि तेलबियांवर स्टॉक लिमिट लावले होते. 31 डिसेंबर 2022 पर्यंत सदर स्टोक लिमिट लावण्यात आले होते. मात्र आता केंद्र शासनाने खाद्यतेल आणि तेल बियांवर असलेले स्टॉक लिमिट काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या असल्याने स्टॉक लिमिट काढून घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे ग्राहक मंत्रालयाने नमूद केले आहे.
दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन बाजार भाव वधारत आहेत. मात्र भारतीय सोयापेंडला मागणी कमी असल्याने, तसेच स्टॉक लिमिट आणि वायदे बंदीमुळे सोयाबीनला चांगला दर मिळत नसल्याचे जाणकार लोकांनी नमूद केले आहे. दरम्यान आता स्टॉक लिमिट काढली असल्याने सोयाबीन बाजारभावाला मोठा दिलासा मिळणार असून सोयाबीन बाजार भाव लवकरच सुधारणार असल्याचे चित्र आहे.
दरम्यान केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे सोयाबीन बाजारात सोयाबीन दरात किंचित वाढ झाली आहे. येत्या काही दिवसात सोयाबीन बाजारभावात अजून वाढ होणार आहे. जाणकार लोकांच्या मते येत्या काही दिवसात सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजार भाव मिळू शकतो. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करणे त्यांच्यासाठी फायद्याचे राहणार आहे.