Soybean Bajarbhav : गेल्या आठवड्यापासून सोयाबीन दरात वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात केंद्र शासनाने 2021 मध्ये खाद्यतेल आणि तेलबियांवर लावलेले स्टॉक लिमिट काढून घेतले. स्टॉक लिमिट काढले असल्याने तेलबियांचे दर कडाडले आहेत.
सोयाबीन दराला देखील स्टॉक लिमिट काढले असल्याने आधार मिळत असून सोयाबीन दरात वाढ होत आहे. गेल्या आठवड्यापूर्वी सोयाबीन 5000 रुपये प्रति क्विंटल वर विक्री होत होता मात्र आता केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे सोयाबीन दरात वाढ झाली असून सोयाबीन 6000 रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास स्थिरावला आहे.
दरम्यान आता सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना सोयाबीन दरात अजून वाढ होण्याची आशा आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक करण्यास सुरुवात केली असून बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली आहे. काल झालेल्या लिलावात लातूर एपीएमसी मध्ये सोयाबीनला 6300 रुपये प्रति क्विंटलचा कमाल बाजारभाव मिळाला आहे.
विशेष म्हणजे काल सरासरी बाजार भाव देखील या एपीएमसी मध्ये 5,550 रुपये नमूद करण्यात आला आहे. काल राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल ते 5741 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळाला आहे. निश्चितच सरासरी बाजारभावात अजून वाढ होण्याची शेतकऱ्यांची आशा आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
जाणकार लोकांनी देखील सोयाबीनला या हंगामात 6 हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजार भाव मिळणार असा अंदाज वर्तवला आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव आता विक्री करणे ऐवजी साठवणूक करण्यावर अधिक भर देत आहे. दरम्यान काही ठिकाणी शेतकरी बांधव जागेवर सोयाबीनची विक्री करत आहेत. खरं पाहता गेल्यावर्षी सोयाबीनला चांगला दर मिळाला.
या वर्षी देखील गेल्यावर्षीप्रमाणेच दर मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र सोयाबीन दरात सुरुवातीपासून मोठा दबाव पाहिला मिळाला. शिवाय यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन उत्पादनात घट झाली असल्याने शेतकरी बांधवांना सध्या मिळत असलेल्या दरात सोयाबीन विक्री परवडत नसल्याचे चित्र आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी दरवाढीच्या आशेने सोयाबीनची साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या मते, येत्या काही दिवसात सोयाबीन दरात वाढ होण्याची आशा आहे. अशा परिस्थितीत सध्या मिळत असलेल्या दरात सोयाबीनची विक्री करावी की नाही हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढ्यात आहे. जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव ध्यानात ठेवून सोयाबीनची विक्री करत राहणे त्यांच्यासाठी फायद्याचे राहणार आहे.