Soybean Bajarbhav : एका रात्रीतच सोयाबीन बाजार भावात पाचशे रुपयांची घसरण ; वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

Ajay Patil
Published:
soyabean production

Soybean Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारभावात रोजाना चढ-उतार पाहायला मिळत आहे. काल सोयाबीनच्या बाजारभावात (Soybean Rate) पाचशे रुपयांची वाढ झाली होती. काल पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत सोयाबीन विक्री होत होता. मात्र आज सोयाबीनच्या बाजारभावात पाचशे रुपयांची घसरण झाली असून सोयाबीन पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होत आहे.

सोयाबीनच्या बाजारभावात कमालीची चढ-उतार होत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव संभ्रमात सापडले आहेत. दरम्यान यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच सोयाबीन पीक अंतिम टप्प्यात असताना आलेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचा दर्जा खालावला आहे. शिवाय आता काढणी होत असलेला सोयाबीनमध्ये अधिक आद्रता असल्याने अशा सोयाबीनला बाजारात कमी बाजार भाव मिळत आहे.

दरम्यान पावसामध्ये सापडलेला सोयाबीन अधिक काळ साठवून ठेवता येणे शक्य नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव सोयाबीनची कारणे झाल्यानंतर लगेचच सोयाबीन विक्री करत असल्याचे चित्र आहे. शेतकरी बांधव सध्या खेडा खरेदीमध्ये सोयाबीन विकत आहेत. यामुळे बाजारापेक्षा सोयाबीनला कमी दर मिळत आहे.

दरम्यान काल सोयाबीनच्या बाजारभावात चांगली वाढ झाली होती मात्र आज पुन्हा एकदा सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच सोयाबीनच्या बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावाची थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजार भाव सविस्तर.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/10/2022
उदगीरक्विंटल4600520052605230
कारंजाक्विंटल8000435051004675
श्रीरामपूरक्विंटल92460049004750
सेलुक्विंटल282420049004500
तुळजापूरक्विंटल460510051005100
राहताक्विंटल67430051804750
धुळेहायब्रीडक्विंटल26485552204855
सोलापूरलोकलक्विंटल627400051154775
नागपूरलोकलक्विंटल798420050764857
हिंगोलीलोकलक्विंटल1560428052054742
परांडानं. १क्विंटल12495049504950
वडूजपांढराक्विंटल200500052005100
अकोलापिवळाक्विंटल4138370052154900
चोपडापिवळाक्विंटल25490051515151
बीडपिवळाक्विंटल696340050514703
वाशीमपिवळाक्विंटल6000465052505000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल2700465051504950
पैठणपिवळाक्विंटल33395047004500
भोकरदनपिवळाक्विंटल80450050004800
भोकरपिवळाक्विंटल1086300051044052
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल7200430551254725
शेवगावपिवळाक्विंटल14435047004700
परतूरपिवळाक्विंटल492437650304900
गंगाखेडपिवळाक्विंटल23500052005100
देउळगाव राजापिवळाक्विंटल260350050004600
तळोदापिवळाक्विंटल4450051005000
किनवटपिवळाक्विंटल120480050004950
मुखेडपिवळाक्विंटल100500051755100
आष्टी-जालनापिवळाक्विंटल110431150014700
पांढरकवडापिवळाक्विंटल65470048254775
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe