Soybean Bajarbhav : अहमदनगर जिल्ह्यात सोयाबीन दरात वाढ ! मिळतोय ‘इतका’ दर ; वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

Ajay Patil
Published:
Soyabean Production

Soybean Bajarbhav : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. अहमदनगर जिल्ह्यातील सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र देखील विशेष उल्लेखनीय आहे.

दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर एपीएमसीमध्ये आज सोयाबीनला 5600 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला असून 5200 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी बाजार भाव मिळाला आहे.

निश्चितच सोयाबीन अजूनही 6000 रुपये प्रति क्विंटलच्या आतच विक्री होत आहे. मात्र हंगामाच्या सुरुवातीशी तुलना केली असता सध्या सोयाबीनला समाधानकारक दर मिळत आहे.

राज्यातील जवळपास सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन 5000 रुपये प्रति क्विंटल ते साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या सरासरी बाजार भावात विक्री होत आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या सोयाबीन लिलावाची माहिती जाणून घेणार आहोत.

राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- राहता एपीएमसीमध्ये आज 141 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे तसेच सरासरी बाजार भाव 5500 रुपये नमूद करण्यात आला आहे.

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 553 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4800 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5600 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5200 प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- माजलगाव एपीएमसी मध्ये आज 2075 क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5650 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5451 रुपये नमूद करण्यात आला आहे.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- कारंजा एपीएमसी मध्ये आज 7000 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5150 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून कमाल दर 5590 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5375 रुपये नमूद करण्यात आला आहे.

परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार :- या एपीएमसी मध्ये आज 2 हजार क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5251 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5675 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5445 रुपये नमूद करण्यात आला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- अमरावती एपीएमसीमध्ये आज दहा हजार 530 क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झाली. आज झालेले लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5100 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5439 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५२६९ रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1268 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4651 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५३६३ रुपये नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 1350 क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झाली. झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला ५३०० भरती गुंतले एवढा किमान दर मिळाला असून 5805 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5552 नमूद करण्यात आला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 14,126 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5200 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 6271 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल तर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5800 रुपये नमूद करण्यात आला आहे.

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज सोयाबीनची 9,424 क्विंटल आवक झाली. आज झालेले लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला ४९०० रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून सहा हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५५५० रुपये नमूद करण्यात आला.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसी मध्ये आज 5657 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4400 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5900 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5600 रुपये नमूद करण्यात आला आहे.

मुर्तीजापुर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज चार हजार 600 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5175 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5895 प्रतिक गुंतला एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5585 रुपये नमूद करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe