Soybean Bajarbhav : सोयाबीन हे खरीप हंगामात (Kharif Season) उत्पादित केले जाणारे एक मुख्य नगदी पीक (Cash Crop) आहे. खरं पाहता गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला उच्चांकी बाजार भाव (Soybean Rate) मिळाला असल्याने या वर्षी सोयाबीनच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.
सोयाबीनला गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी देखील चांगला बाजार भाव (Soybean Market Price) मिळेल या आशेने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी (Farmer) सोयाबीनची पेरणी वाढवली आहे. मात्र यावर्षी हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीनला नगण्य बाजार भाव (Soybean Rate) मिळत आहे.
एक ऑक्टोबरपासून सोयाबीनचा हंगाम सुरू झाला असून सुरुवातीपासूनच या वर्षी सोयाबीन बाजारभाव दबावात पाहायला मिळत आहेत. सध्या सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आतच बाजार भाव मिळत आहे. एकीकडे सोया तेलाची मागणी आणि बाजारभाव दोन्ही वाढत असून दुसरीकडे सोयाबीनला मात्र कवडीमोल बाजार भाव मिळत आहे.
यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दरम्यान आज देखील सोयाबीन बाजारभाव पाच हजाराच्या आतच नमूद करण्यात आला आहे. जाणकार लोकांच्या मते, यावर्षी सोयाबीनला मात्र पाच हजार रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होणार आहे. या वर्षी सरकारकडे बफर स्टॉक मध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने सोयाबीनचे बाजार भाव कमी आहेत.
तसेच सध्या आवक होत असलेल्या सोयाबीनमध्ये आद्रता अधिक असल्याने सोयाबीनला अपेक्षित असा बाजारभाव मिळत नाहीये. तसेच यावर्षी उत्पादन वाढणार असल्याचा दावा देखील केला जात आहे. अशा परिस्थितीत सोयाबीनला कमी बाजार भाव मिळत आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या मते, यावर्षी मध्यंतरी झालेल्या अतवृष्टीमुळे आणि आता शेवटी परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असून सोयाबीन उत्पादनात मोठी घट होणार आहे.
एकंदरीत उद्योगाकडून उत्पादनात वाढ आणि शेतकऱ्यांकडून उत्पादनात घट होणार असल्याचा दावा केला जात आहे. तसेच नेमके उत्पादनात घट झाली आहे की उत्पादनात वाढ झाली आहे याबाबत स्पष्टता येण्यासाठी अजून अधिकृत आकडेवारी आलेली नाही. परिणामी सोयाबीन बाजार भाव भविष्यात वाढेल की कमी होईल याबाबत अजून अंदाज बांधता येणे कठीण आहे.
दरम्यान जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी पाच हजार रुपये प्रतिक्विंटल हा बाजार भाव गृहीत धरून सोयाबीनची बाजारपेठेचा आढावा घेत विक्री केली पाहिजे. मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे आपण रोज सोयाबीनच्या बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील सोयाबीन बाजार भाव जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.
मित्रांनो आज रविवार असल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड एपीएमसीमध्ये केवळ सोयाबीनचा लिलाव झाला आहे. आज सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनचे 184 क्विंटल आवक आली.
आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा समाज बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव साडेचार हजार रुपय प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.