Soybean Bajarbhav : यंदाचा आतापर्यंतचा संपूर्ण हंगामभर महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आहेत. यावर्षी सोयाबीनला अतिशय कवडीमोल दर मिळत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव संकटात असल्याचे चित्र आहे. सध्या राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 5000 ते 5900 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळत आहे.
गेल्या हंगामात सोयाबीनला 6000 रुपये प्रति क्विंटल ते 7000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी बाजारभाव महाराष्ट्रात मिळत होता. यामुळे यावर्षी देखील चांगला बाजार भाव मिळेल या आशेने राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांनी सोयाबीनची पेरणी केली आहे. मात्र यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची दरवाढीचे आशा फोल ठरली आहे.
मात्र असे असले तरी देशातील एका राज्यात सोयाबीनला चांगला विक्रमी बाजारभाव मिळत असल्याचे चित्र आहे. आपले शेजारील राज्य मध्यप्रदेश मध्ये देखील सोयाबीनला थोडा समाधानकारक बाजार भाव मिळत आहे. मध्यप्रदेश मधील काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सात हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा कमाल बाजारभाव मिळत आहे. मित्रांनो मध्यप्रदेशच्या बदनावर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल सात हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा कमाल बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
निश्चितच मध्य प्रदेश मधील या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला समाधानकारक बाजार भाव मिळाला असल्याने मध्य प्रदेश राज्यातील शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर मदनाचे भाव पाहायला मिळत आहेत. मित्रांनो या व्यतिरिक्त मणिपूर मध्ये देखील सोयाबीन बाजार भावात मोठी वाढ झाली आहे. मित्रांनो मनिपुर मध्ये सोयाबीनची आवक खूपच कमी प्रमाणात होते. शिवाय मणिपूरमध्ये सोयाबीन देखील कमी प्रमाणात उत्पादित होतो.
अशा परिस्थितीत तिथे नेहमीच बाजार भाव तेजीत पाहायला मिळतात. सध्या मणिपूरमध्ये सोयाबीनला दहा हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा कमाल बाजार भाव मिळत आहे. आज आपण मनिपुर मधील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजार भाव मिळत आहे याची माहिती जाणून घेणार आहोत.
इंफाल कृषी उत्पन्न बाजार समिती :- मणिपूर राज्यातील या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 52 क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. या बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात आज सोयाबीनला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
बिशनपुर कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज केवळ दोन क्विंटल सोयाबीनचे आवक झाली होती. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 9,400 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून दहा हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 9,700 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.