Soybean Bajarbhav : ‘या’ बाजारात सोयाबीनला मिळाला सर्वोच्च बाजारभाव ; सोयाबीन साडे पाच हजारावर, वाढतील का सोयाबीन बाजारभाव?

soyabean production

Soybean Bajarbhav : गेल्या हंगामात सोयाबीनला (Soybean Crop) विक्रमी बाजार भाव (Soybean Market Price) मिळाला असल्याने यावर्षी सोयाबीन पेरा वाढला आहे. मात्र यावर्षी हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीन दर (Soybean Rate) दबावात आहेत. शेतकरी बांधवांच्या (Farmer) मते, सध्या बाजारात दाखल होणारा नवीन सोयाबीनमध्ये अधिक आद्रता असल्याचे कारण पुढे करत व्यापारीवर्ग सोयाबीनचे बाजारभाव हाणून पाडत आहेत.

तसेच अजून नाफेड (Nafed Soybean) खरेदी साठी उतरले नसल्याने सोयाबीनच्या बाजार भावात घसरण होत असल्याचे शेतकऱ्यांकडून नमूद केले जात आहे. जाणकार लोकांच्या मते या वर्षी सोयाबीन मधील आद्रता कमी झाल्यानंतर नाफेड खरेदी करण्यासाठी उतरणार आहे. दरम्यान काही व्यापाऱ्यांच्या मते, खाद्यतेल आयातीला करमुक्त केले गेले असल्यामुळे सोयाबीनला बाजारात अजूनही उठाव नाही.

यामुळे आवक कमी असून देखील सोयाबीनच्या बाजार भावात वाढ होत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान आगामी काळात देखील सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होणं अशक्य असल्याचे काही जाणकारांनी नमूद केले आहे. दरम्यान तज्ज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या हंगामात सोयाबीन पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपासच स्थिरावणार आहे.

दुसरीकडे शेतकरी बांधवांच्या मते, यावर्षी हवामान बदलामुळे आणि पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादन खर्चात कमालीची वाढ झाली आहे. तसेच मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि आता सोयाबीन पिकाच्या अंतिम टप्प्यात परतीच्या पावसामुळे सोयाबीन पीक उत्पादनात मोठी घट होणार आहे. यामुळे सध्या मिळत असलेल्या बाजार भावात उत्पादन खर्च देखील निघणार नाही.

एकंदरीत, यावर्षी चांगला बाजारभाव मिळाला असल्याने यावर्षी देखील विक्रमी बाजार भाव मिळेल या आशेने शेतकरी बांधवांनी सोयाबीन पेरा वाढवला होता मात्र यावर्षी हवामान बदलामुळे आणि बाजारात सोयाबीनला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतकरी बांधवांची दरवाढीची आशा फोल ठरली आहे.

मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच सोयाबीनच्या बाजारभावाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये झालेल्या सोयाबीन लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :– लासलगाव एपीएमसीमध्ये आज 4568 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 67 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 841 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज खान्देशातील जळगावात 153 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 700 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोयाबीन लिलावासाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची तब्बल आठ हजार क्विंटल आवक नमूद करण्यात आली आहे. आज कारंजा एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला तीन हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 65 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 575 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला.

तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- तुळजापूर एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात आज 375 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव देखील तेवढाच नमूद करण्यात आला.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- विदर्भातील नागपूर एपीएमसीमध्ये आज दोन हजार 397 क्विंटल सोयाबीनचे आवक नमूद करण्यात आली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 877 रुपये प्रतिक्विंटल नमूद झाला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- महाराष्ट्रातील एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणजे हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एक हजार क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये लोकल सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार पाच रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 702 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन लिलावासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाते. या एपीएमसीमध्ये आज पिवळ्या सोयाबीनची तीन हजार 393 क्विंटल आवक नमूद करण्यात आली. आज झालेला लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 350 रुपये प्रतिक्विंटल आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला मिळाला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- अमरावती विभागातील एक महत्त्वाची बाजारपेठ अर्थातच यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 459 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार 780 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 890 रुपये प्रतिक्विंटल नमूद झाला आहे.

बीड कृषी उत्पन्न बाजार समिती :- मराठवाड्यातील बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पिवळ्या सोयाबीनची 155 क्विंटल आवक नमूद करण्यात आली आहे. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 850 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 481 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला.

परतूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज परतूर एपीएमसीमध्ये सोयाबीनची 169 क्विंटल आवक नमूद करण्यात आली आहे. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 850 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला.

देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- देऊळगाव राजा एपीएमसीमध्ये आज 182 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 700 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 160 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 640 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5145 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 955 रुपये प्रतिक्विंटल नमूद झाला आहे.

केज कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात आज पिवळ्या सोयाबीनची 365 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 167 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 876 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात आज 934 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 40 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 720 रुपये प्रतिक्विंटल नमूद झाला आहे.

उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज सर्वोच्च बाजारभावाची नोंद करण्यात आली आहे. एपीएमसीमध्ये आज 320 क्विंटल पिवळा सोयाबीनची आवक झाली होती. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला.

उमरखेड डाँकी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये देखील आज उच्चांकी बाजारभावाची नोंद झाली आहे. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये पिवळा सोयाबीनची 600 क्विंटल आवक झाली होती. या एपीएमसीमध्ये पिवळ्या सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल नमूद झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe