Soybean Bazar Bhav : सोयाबीन (Soybean Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार आहेत मुख्य पीक आहे. या पिकाची लागवड संपूर्ण भारतवर्षात खरीप हंगामात (Kharif Season) केली जाते. राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव (Farmer) सोयाबीन या खरीप हंगामातील मुख्य पिकावर अवलंबून असतात.
गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला उच्चांकी बाजार भाव (Soybean Market Price) मिळाला होता. त्यामुळे यावर्षी राज्यात सोयाबीन लागवडीखालील (Soybean Farming) क्षेत्रात वाढ झाली आहे असं तज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान राज्यात अद्याप नवीन सोयाबीनची आवक अपेक्षित अशी पाहायला मिळत नाही. मात्र असे असले तरी सोयाबीनच्या बाजारभावात (Soybean Rate) अजुनही घसरण पाहायला मिळत आहे. सोयाबीनला गेल्या काही महिन्यांपासून 5 हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव मिळत आहे.
खरं पाहता, यावर्षी सोयाबीनला गेल्या वर्षीपेक्षा कमी बाजार भाव मिळणार असल्याचा अंदाज तज्ञांनी आधीच व्यक्त केला आहे. काम आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सोयाबीनला या वर्षी पाच हजार रुपये प्रति येऊन क्विंटलच्या आसपासच बाजार भाव मिळणार आहेत.
मात्र असं असलं तरी यावर्षी हमीभावापेक्षा सहाशे ते सातशे रुपये अधिक बाजार भाव सोयाबीनला मिळणार आहे. या वर्षी केंद्राने सोयाबीनला 4300 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव लावून दिला आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच सोयाबीनच्या बाजार भावाची चर्चा करत असतो.
आज देखील आपण राज्यात प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेल्या बाजारभावाची थोडक्यात चर्चा करणार आहोत. खरं पाहता आज महाराष्ट्र राज्य कृषि पणन महामंडळ यांचा अधिकृत वेबसाईटवर एकाच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलावाची माहिती समोर आली आहे. आज फक्त केज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचा लिलाव झाल्याची माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे.
केज कृषी उत्पन्न बाजार समिती :- केज एपीएमसीमध्ये आज 422 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये पिवळ्या सोयाबीनला 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.