Soybean Market Price : सोयाबीन बाजारभाव साडेपाच हजारावर…! वाढतील का सोयाबीन बाजारभाव?

Published on -

Soybean Market Price : गेल्या दोन दिवसांपूर्वी नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सात हजार 111 रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी बाजार भाव मिळाला होता. यामुळे आगामी काळात सोयाबीनचे बाजार भाव (Soybean Bajarbhav) वाढतील अशी शेतकरी बांधवांची (Farmer) आशा होती. मात्र नागपूर एपीएमसीमध्ये (Nagpur Apmc) दुसऱ्याचं दिवशी सोयाबीनच्या बाजार भावात (Soybean Rate) मोठी पडझड झाली.

सध्या यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Apmc) सोयाबीनला पाच हजार रुपयाच्या आसपास बाजार भाव मिळत आहे. काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची साडेपाच हजाराकडे वाटचाल सुरू आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी सोयाबीन पाच हजार रुपयांच्या आसपासच विक्री होणार आहे.

यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सोयाबीनचा बाजारभाव थोडीशी घसरण राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सोयाबीनला (Soybean Crop) या वर्षी 4 हजार 300 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव लावून देण्यात आला आहे. म्हणजे यावर्षी हमीभावापेक्षा सोयाबीनला अधिक बाजार भाव मिळणार आहे.

मात्र गतवर्षीपेक्षा यावर्षी सोयाबीनला कमी बाजार भाव मिळणार असल्याचे जाणकारांनी स्पष्ट केले आहे. जाणकार लोकांच्या मते, यावर्षी सोयाबीनचा साठा देशांतर्गत मुबलक प्रमाणात असल्याने सोयाबीनचे बाजार भाव पाच हजाराच्या आसपासच राहणार आहे. मित्रांनो आता आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजार भाव मिळाला याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती:- लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 847 क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 181 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 134 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4811 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- तुळजापूर एपीएमसीमध्ये आज 110 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4975 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज्या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती:- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 193 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 170 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार दहा रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 765 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती:- दोन दिवसांपूर्वी नागपुर एपीएमसीमध्ये सात हजार रुपये प्रति क्विंटल एवढा उच्चांकी बाजार भाव सोयाबीनला मिळाला होता. यामुळे नागपुर एपीएमसी चांगलीचं चर्चेत आली होती. मात्र या एपीएमसीमध्ये आता सोयाबीनचे बाजार भाव कमालीचे घासरले आहेत. आज या बाजारात सोयाबीनला 4,500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 991 बाजार भाव मिळाला आहे. तसेच या एपीएमसीमध्ये आज 4,888 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- हिंगोली एपीएमसीमध्ये आज 500 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार अकरा रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच 4805 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- कोपरगाव एपीएमसीमध्ये आज 102 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार एक रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 965 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 699 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.

मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 500 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समिती :- ताडकळस एपीएमसीमध्ये आज 94 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती :- जालना एपीएमसीमध्ये आज 263 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 3800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 850 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच या एपीएमसीमध्ये चार हजार 750 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीन ला मिळाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या एपीएमसीमध्ये आज 855 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात अकोला एपीएमसीमध्ये 3333 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 970 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच चार हजार 765 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज अकोला एपीएमसी मध्ये नमूद करण्यात आला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- यवतमाळ एपीएमसीमध्ये आल 130 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 650 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 935 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज एपीएमसीमध्ये चार हजार 792 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती:- चिखली एपीएमसीमध्ये आज 131 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4251 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 725 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 638 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.

हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती :- हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 1469 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनचा 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 160 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच एपीएमसीमध्ये 4820 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे.

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- वाशिम एपीएमसीमध्ये आज तीन हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार एक रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज या एपीएमसीमध्ये 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली खानेगाव नाका कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 125 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.

मुर्तीजापुर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 300 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 425 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4905 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 725 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- मलकापूर एपीएमसीमध्ये आज 273 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 51 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच 4555 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!