Soybean Market Price: सोयाबीन बाजारात नेताय ना…! मग सोयाबीनचे आजचे बाजारभाव जाणून घ्या अन विक्रीचे नियोजन आखा

Soybean Market Price: मित्रांनो भारतात सोयाबीन (Soybean Crop) एक नगदी पिक (Cash Crop) म्हणून मोठ्या प्रमाणात लावले जाते. आपल्या राज्यात देखील सोयाबीनची शेती (Soybean Farming) मोठी उल्लेखनीय आहे. भारतात सोयाबीन उत्पादनाच्या (Soybean Production) बाबतीत मध्यप्रदेश पाठोपाठ भारत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.

अशा परिस्थितीत महाराष्ट्रात बहुतांश शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर अवलंबून असल्याचे चित्र आहे. यामुळे राज्यातील बहुतांशी शेतकरी सोयाबीनच्या बाजारभावाकडे (soybean rate) मोठ्या उत्सुकतेने लक्ष ठेवत असतात.

आम्ही देखील आपल्या राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Soybean grower farmer) रोजच सोयाबीनचे ताजे बाजार भावाची माहिती घेऊन हजर होत असतो. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया 16 ऑगस्टचे सोयाबीनचे ताजे बाजार भाव.

राहता कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज राहता कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये एकूण 33 क्विंटल सोयाबीनची ओळख नमूद करण्यात आले आहे. आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 6,149 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त बाजार भाव मिळाला आहे, तर 6050 एवढा कमीत कमी बाजार भाव सोयाबीनला आज मिळाला. शिवाय या एपीएमसीमध्ये सोयाबीनला सहा हजार 100 एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची 165 क्‍विंटल आवक झाली. आज नागपुर एपीएमसीमध्ये सोयाबीनला सहा हजार 251 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला तर कमीत कमी बाजार भाव पाच हजार 451 रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला. शिवाय या एपीएमसीमध्ये 6050 एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे. 

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 1493 क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये सहा हजार 280 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला कमाल बाजार भाव मिळाला, तर किमान बाजार भाव पाच हजार शंभर एवढा राहिला. सर्वसाधारण बाजारभाव आज सहा हजार 195 रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.

सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समिती:- या एपीएमसीमध्ये आज 110 क्विंटल सोयाबीनची आवक नमूद करण्यात आली आहे. या एपीएमसीमध्ये आज सहा हजार 100 एवढा जास्तीत जास्त दर मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव होता. आज या एपीएमसीमध्ये सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe