सोयाबीन दरात मोठा बदल! मिळाला ‘इतका’ दर ; वाचा आजचे बाजार भाव

Ajay Patil
Published:
Soybean price

Soybean News :- सोयाबीन हे खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे. या पिकाची भारतातील बहुतांशी राज्यात लागवड केली जाते. यामध्ये आपले महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यात सर्वाधिक लागवड केली जाते.

खरं पाहता सोयाबीन हे एक नगदी पीक आहे. मात्र सध्या सोयाबीनचे बाजार भाव खूपच कमी आहेत. सोयाबीनला सरासरी पाच हजार रुपये प्रति क्विंटल ते पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे.

निश्चितच सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा म्हणजे 4300 रुपये प्रतिक्विंटल पेक्षा अधिक आहेत. परंतु उत्पादनासाठी अधिकचा खर्च करावा लागला असल्याने हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असला तरी देखील प्रत्यक्षात शेतकरी बांधवांना हा दर परवडत नसल्याचे चित्र आहे.

त्यामुळे तूर्तास सोयाबीनची विक्री शेतकऱ्यांनी कमी केली आहे. अशातच जाणकार लोकांनी सोयाबीन दर वाढीचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दरम्यान आज आपण नेहमीप्रमाणेच सोयाबीन बाजारभावाची थोडक्यात पण डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सिल्लोड कृषी उत्त्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 80 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच दर 5300 रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.

कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 40 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच दर 5000 रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 130 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच दर 5200 रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe