Soybean News : सोयाबीन दरात किंचित सुधारणा ; भविष्यात वाढतील का बाजारभाव ? वाचा तज्ञ लोकांचे मत

Published on -

Soybean News : सोयाबीन हे एक असं मेजर क्रॉप आहे ज्याची शेती महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात होते. साहजिकच या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. शिवाय गेल्यावर्षी सोयाबीनला चांगला ऐतिहासिक असा बाजारभाव मिळाला असल्याने यंदा देखील सोयाबीनला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती.

मात्र झालं उलट या वर्षी सोयाबीनला अपेक्षित असा दर सुरुवातीपासून मिळालेला आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी सोयाबीनला मात्र 6000 रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळू लागला होता. परंतु तदनंतर सोयाबीन दरात घसरण होण्यास सुरुवात झाली. आता सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दरात विकला जात आहे.

दरम्यान काल काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीशी सुधारणा झाली आहे. यामुळे भोळ्याभाबड्या शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाचे भाव झळकू लागले आहेत. मात्र असे असले तरी शेतकरी बांधवांच्या मनात भविष्यात अजून दर वाढतील की नाही याबाबत कुठे ना कुठे संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे.

अशातच जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्रिसमसच्या सुट्टीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे सौदे सुरू झाले. आंतरराष्ट्रीय बाजार सुरू झाल्यानंतर सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली. सोयाबीनचे आंतरराष्ट्रीय वायदे पंधरा डॉलर प्रति बुशेल्सवर पोहचले होते. याचा परिणाम म्हणून देशांतर्गत सोयाबीन दरात थोडीशी वाढ झाली.

काही एपीएमसी मध्ये सोयाबीनला चांगला दर मिळाला. सरासरी 5300 ते 5600 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर काल नमूद झाला आहे. निश्चितच सध्या मिळत असलेला दर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा एवढा नाही. मात्र जानेवारीमध्ये यात वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे. निश्चितचं यामुळे शेतकऱ्यांना कुठे ना कुठे दिलासा मिळेल.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मात्र असे असले तरी आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांना सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री करत राहण्याचा सल्ला देऊ. शेतकरी बांधवांना जर त्यांना अपेक्षित असा दर बाजारात मिळत असेल तर त्यांनी सोयाबीनची विक्री करावी मात्र विक्री करताना घाई करू नये.

तसेच सर्वच सोयाबीन साठवणूक करून ठेवू नये, म्हणजेच जर भविष्यात दरात पडझड झाली तर शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही. तसेच सर्व सोयाबीन विक्री करू नये म्हणजेच जर भविष्यात सोयाबीनच्या दरात वाढ झाली तर शेतकरी बांधवांना झालेले नुकसान भरून काढता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News