Soybean Price Maharashtra : सध्या सोयाबीन दर दबावात आहेत. मात्र चिंता करण्याचे काही कारण नाही ; कारण की, लवकरच बाजारभावात वाढ होणार आहे. जाणकार लोकांनी येत्या आठवड्यात दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.
खरं पाहता दर दबावात असल्याने बाजारात सोयाबीन आवक कमी झाली आहे. यामुळे आवकेमुळे किमतीवर नकारात्मक परिणाम पडत नाहीये. तसेच पामतेलचे दर मलेशियात दिवसागणिक वाढत आहेत. यामुळे येत्या आठवड्यात सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता कृषी तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

खरं पाहता गेल्या वर्षी सोयाबीनला विक्रमी दर मिळाला, परिणामी यावर्षी पीक पेरा वाढला. यंदा चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच सोयाबीन दरात घसरण झाली. एका मीडिया रिपोर्टनुसार सोयाबीन दरात त्यावेळी 15 टक्के एवढी घसरण होती. सोयाबीनला मात्र 4000 रुपये प्रति क्विंटल एवढाच दर मिळत होता. परिणामी शेतकऱ्यांनी मालाची साठवणूक करण्यास सुरुवात केली.
यामुळे बाजारात मालाची कमतरता भासू लागली. उद्योगाकडून मागणी वाढत होती मात्र त्याप्रमाणे पुरवठा होत नव्हता. यामुळे पुन्हा सोयाबीन दरात वाढ झाली आणि सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या घरात आलेत. दरम्यान आता त्यामध्ये थोडीशी घट झाली असली तरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी अशी की येत्या हप्त्याभरात सोयाबीन दरात शंभर रुपयांपर्यंतची वाढ होणार आहे.
सोयाबीन बाजारभाव पूर्ववत होणार आहेत. सोयाबीनची बाजारात आवक कमी असल्याने उद्योगाची गोची होत आहे. तसेच पामतेलाचे आंतरराष्ट्रीय बाजारात दर जवळपास तीन टक्के वाढले आहेत. पामतेलाच्या दरात वाढ झाली म्हणजे सोयाबीन तेलाला आधार मिळणार आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे. जाणकारांच्या मते खूप मोठी वाढ होईल असं नाही मात्र शंभर ते दोनशे रुपयांपर्यंतची वाढ होणार आहे.