मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आता शेतकऱ्यांना घरी बसून ऑनलाईन मागवता येणार कीटकनाशक ; ऍमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या कंपन्या विक्री करणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : देशात सध्या मोबाईलचे युग सुरू आहे. आता सर्व काम हातात असलेल्या एका छोट्याशा स्मार्टफोनच्या माध्यमातून केली जात आहेत. अगदी पैशांची देवाण-घेवाण करण्यापासून ते इतर कोणत्याही वस्तूंची खरेदी करण्यापर्यंत सर्व कामे मोबाईल मधून ऑनलाइन पद्धतीने सहजरीत्या करता येतात.

मात्र आतापर्यंत पिकासाठी आवश्यक कीटकनाशकांची ऑनलाइन पद्धतीने विक्री केली जात नव्हती. मात्र आता केंद्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला असून यापुढे पिकांसाठी आवश्यक कीटकनाशक देखील ऑनलाईन पद्धतीने विकली जाणार आहेत.

यामुळे शेतकऱ्यांना आता घरबसल्या कीटकनाशक मागवता येणार आहेत. साहजिकच यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे. शिवाय, यामुळे कीटकनाशकांच्या दरावर देखील अंकुश राहणार आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या अनेक ई-कॉमर्स साईटच्या माध्यमातून कीटकनाशकांची विक्री होणार आहे. यासाठी केंद्र शासनाने कायद्यात धोरणात्मक बदल केला आहे.

ऑनलाइन कीटकनाशक विक्रीसाठी परवानगी देणे हेतू केंद्र शासनाला कीटकनाशक नियम 1971 मध्ये सुधारणा करावी लागली आहे. म्हणजेच आता भारतात कीटकनाशक व्यापारासाठी ज्याकडे लायसन्स उपलब्ध आहे ते ऑनलाईन पद्धतीने कीटकनाशक विक्री करू शकणार आहेत.

साहजिकच या निर्णयाचा फायदा कीटकनाशक बनवणाऱ्या कंपन्या तसेच कीटकनाशक विक्री संबंधित असलेले व्यवसायास फायदा होणार असून शेतकरी बांधवांना देखील घरपोच कीटकनाशक उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे जवळच्या बाजारावर विसंबून राहण्याच काम राहणार नाही.

यामुळे कीटकनाशकांच्या दरावर देखील अंकुश राहणार आहे. म्हणजेच आता शेतकरी बांधवांना कीटकनाशक घेण्यासाठी दुसरीकडे कुठेच जाण्याच्या आवश्यकता नाही. शेतकरी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून amazon किंवा flipkart यांसारख्या ई-कॉमर्स साईटच्या माध्यमातून आवश्यक कीटकनाशकांची ऑर्डर देऊ शकणार आहेत आणि ऑर्डर त्यांना घरपोच मिळणार आहे.

मात्र असे असले तरी अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर कोणीही कीटकनाशक विकू शकणार नाही त्यासाठी सदर विक्रेत्याकडे परवाना आवश्यक राहणार आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा होणार असल्याचे काही जाणकारांनी नमूद केले आहे. जाणकारांच्या मते यामुळे बाजारात मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे. म्हणून शेतकऱ्यांना आगामी काळात कीटकनाशक स्वस्तात उपलब्ध होणार आहेत.