Soybean Price : सोयाबीन हे एक मेजर क्रॉप म्हणून ओळखल जात. या पिकाची राज्यात सर्वत्र शेती केली जाते. शिवाय गेल्यावर्षी चांगला दर मिळाला असल्याने यावर्षी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढल आहे. पण यंदा अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाली आहे.
अशा परिस्थितीत गेल्यावर्षाप्रमाणे चांगला दर मिळेल आणि उत्पादनात झालेली घट वाढीव दराने भरून निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु दुष्काळात तेरावा महिना म्हणून उत्पादनात घट झालीच शिवाय दर देखील दबावात आहेत.
अशा परिस्थितीत शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन या वर्षी शेतकऱ्यांसाठी तोट्याचे पीक ठरले आहे. काल सोयाबीन दरात थोडीशी वाढ झाली होती पण आज पुन्हा घसरण झाली आहे. दरम्यान आज आपण सोयाबीनच्या लिलावाची माहिती जाणून घेणार आहोत.
सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 152 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या बाजारसमितीत सोयाबीनला 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5400 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5300 नमूद झाला आहे.
पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 70 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या बाजारात सोयाबीनला 5521 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, कमाल आणि सरासरी दर मिळाला आहे.
शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 53 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावत या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5300 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि सरासरी दर मिळाला आहे.
देवणी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजार समितीत आज बारा क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5402 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5700 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच 5551 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.