Soybean Price : चिंताजनक ! सोयाबीन दरात झाली मोठी घसरण ; वाचा आजचे बाजारभाव

Ajay Patil
Published:
Soyabean Price

Soybean Price : सोयाबीन महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक. या पिकाच्या शेतीवर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून याकडे पाहिले जाते. मात्र यंदा शाश्वत उत्पन्न देणारे हे पीक शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरत आहे.

यावर्षी पावसाचा लहरीपणा खरीप हंगामात ऐरणीवर असल्याने उत्पादनात घट झाली आहे. याशिवाय आता बाजारात सोयाबीनला कवडीमोल दर मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. गेल्या आठवड्याभरापासून सोयाबीन दरात वाढ होण्याची बतावणी केली जात आहे.

मात्र बाजारातील वस्तुस्थिती पाहता सोयाबीन दरात वाढ होईल की नाही याबाबत शेतकरी संभ्रमाअवस्थेत आहेत. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या सोयाबीन लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोयाबीन लिलावासाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या कारंजा एपीएमसी मध्ये आज 3500 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5050 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5450 रुपये एवढा कमाल आणि 5335 रुपये एवढा सरासरी दर मिळाला आहे.

परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये सहाशे क्विंटल सोयाबीन आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5100 रुपये प्रति क्विंटर एवढा किमान दर मिळाला असून 5430 प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि 5331 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 1296 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4400 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5378 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5134 नमूद झाला आहे.

राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 79 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5410 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५३०० नमूद झाला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1009 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला चारचार 4099 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून कमाल दर पाच हजार सहाशे आणि सरासरी बाजार भाव 4849 नमूद झाला आहे.

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- वासिम एपीएमसी मध्ये आज 6000 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये किमान बाजार भाव 4750 रुपये प्रति क्विंटल तर कमाल बाजार भाव 6,357 आणि सरासरी बाजार भाव 6000 रुपये नमूद झाला आहे.

मुर्तीजापुर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 2500 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4960 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5520 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5275 नमूद झाला आहे.

आंबेजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 600 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आता झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5460 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5340 नमूद झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe