Soybean Rate : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागला आहे. हंगामाच्या सुरुवातीला मान्सून लांबला परिणामी सोयाबीन पेरण्या खोळंबल्या.
यानंतर अतिवृष्टीमुळे आणि शेवटी-शेवटी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झालीच मात्र आता नैसर्गिक संकटांचा सामना करून जे थोडं फार सोयाबीन शेतकऱ्यांच्या पदरात पडले आहे त्याला देखील बाजारात अतिशय कवडीमोल दर मिळत आहे.
आज देखील सोयाबीन दरात घसरण झाली असून उत्पादक बेजार झाला आहे. आजही आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाविषयी थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1860 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला तीन हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5550 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5470 रुपये नमूद करण्यात आला आहे.
माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- माजलगाव एपीएमसीमध्ये आज 1966 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5561 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5400 रुपये नमूद करण्यात आला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 49 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान तर मिळाला असून 5400 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5200 रुपये नमूद झाला आहे.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 4300 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5520 प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5616 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5568 रुपये प्रति क्विंटल नमूद झाला आहे.
कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 3500 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5080 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5455 प्रतेक होऊन त्याला एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5370 रुपये नमूद झाला आहे.
परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1100 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5251 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5601 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5421 रुपये नमूद झाला आहे.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये अधिक 148 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5518 प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5400 रुपये नमूद झाला आहे.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 5466 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5395 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5272 नमूद झाला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1114 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4300 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5392 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५११९ रुपये नमूद झाला आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 900 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5626 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५३१३ रुपये नमूद झाला आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 455 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5572 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5370 आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 15 हजार 315 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. या एपीएमसीमध्ये आज 5151 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर सोयाबीनला मिळाला असून 6055 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५६३० रुपये नमूद झाला आहे.