Wheat Market Price : गहू उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. गव्हाच्या बाजारभावात मोठी वाढ नमूद करण्यात आले आहे. खरं पाहता मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने गव्हाच्या बाजारभावात वाढ होत आहे. यामुळे निश्चितच गहू उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा मिळत आहे.
सध्या देशांतर्गत गव्हाला अडीच हजार रुपये प्रति क्विंटल ते 2740 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजारभाव मिळत आहे. बाजारात गव्हाची आवक कमी असल्याने गव्हाच्या दरात वाढ झाल्याचे जाणकारांनी नमूद केले आहे. दरम्यान रब्बी हंगामातील गव्हाची आत्ता पेरणी झाली आहे. म्हणजेच बाजारात नवीन गहू येण्यासाठी भरपूर वाव आहे. बाजारात नवीन गहू एप्रिल महिन्यात येऊ शकतो. अशा परिस्थिती तोपर्यंत बाजार भावात तेजी राहणार असल्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे.
तोपर्यंत सरकारला बफर स्टॉक मधून गरज भागवावी लागणार आहे. दरम्यान बफर स्टॉक मध्ये गव्हाचा साठा कमी असल्याने व्यापारी लोकांकडून गव्हाचा स्टॉक मागे ठेवला जात आहे. सध्या गरजेनुसार विक्री सुरू असल्याचे जाणकार लोकांनी नमूद केले आहे. गहू अडीच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दरात विक्री होत आहे. महाराष्ट्रात 2550 रुपये प्रति क्विंटल ते 2725 रुपये प्रति क्विंटल पर्यंत गव्हाची विक्री होत आहे. निश्चितच सध्या गव्हाला चांगला समाधानकारक बाजार भाव मिळत आहे.
मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी बफर स्टॉकमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्म्याने साठा कमी आहे. अशा परिस्थितीत गव्हाच्या दरात झालेली हीं वाढ किमान नवीन गहू बाजारात येईपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निश्चितच महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत गहू लागवडीखालील क्षेत्र कमी असले तरी देखील राज्यातील गहू उत्पादक शेतकरी बांधवांना याचा मोठा फायदा होणार आहे.
गव्हाच्या पिकातून शेतकऱ्यांना निश्चितच चांगली कमाई होणार असून सुगीचे दिवस शेतकऱ्यांना येणार आहेत. मित्रांनो जर केंद्र सरकारने गव्हाचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी काही कठोर पावले उचलली तर गव्हाच्या दरात घसरण होऊ शकते. मात्र जर अशीच परिस्थिती राहिली तर गव्हाच्या बाजार भावात अजून वाढ होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवण्यात आली आहे.