अकोले :- लोकहितासाठी व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या आ. वैभवराव पिचड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्यास गंभीर परिणाम होतील.
गुन्हा दाखल करण्याअगोदर तालुक्यातील कालवेग्रस्त शेतकरी व प्रत्येक कार्यकत्र्यावर गुन्हा दाखल करावा लागेल व यावेळी होणाऱ्या परिणामास प्रशासनाने तयार राहावे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला.
अकोले तालुक्याचे आ. वैभवराव पिचड यांच्यावर निळवंडे कालवा कृती समितीने अकोले पोलीस ठाणेमध्ये कालव्याचे काम बंद पाडल्याप्रकरणी तक्रार अर्ज दिलेला असून असा अर्ज देण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही.
आ. पिचड यांची हा बदनामी करण्याचा प्रयत्न असून या प्रकाराचा निळवंडे पाटपाणी समिती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे निषेध व्यक्त केला आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, विठ्ठलराव चासकर, यशवंतराव आभाळे, राजेंद्र डावरे, गोरक्ष मालुंजकर, अशोक देशमुख, प्रतापराव देशमुख, शंभु नेहे, सुरेश धुमाळ, सुभाष दामू मालुंजकर, शंकरराव वाळुंज, विकास शेटे, बाळासाहेब घोडके, अशोक आरोटे, रावसाहेब दौंड, बाळासाहेब घोडके, शिवाजी कोठवळ, संतोष तिकांडे, हनुमंता वाळके, गंगाधर नलावडे, अशोक राक्षे, भाऊसाहेब मोरे, राहूल देशमुख, खंडू वाकचौरे, दिलीप शेटे, सुनिल दातीर, दिलीप तिकांडे, अशोक फरगडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
आपल्या नेतृत्वाने पाणी देण्याचे काम केले असून पाणी देण्यास विरोध नसताना फक्त नेण्याच्या पद्धतीत बदल करावा, अशी रास्त मागणी असतानाही कृती समितीने असा प्रकार केला आहे. त्यामुळे यापुढील काळात या कृती समितीस जशासतसे उत्तर देण्याचा संकल्प योवळी कार्यकर्त्यांनी केला.