अहमदनगर : नागापूर येथील अक्षय रावसाहेब जायभाय या युवकास अपहरण करून २० लाचांची खंडणी मागून न दिल्यास तुमच्या मुलास ठार मारू अशी देवून जायभाय याचे अपहरण केल्याप्रकरणी सहाजणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा घडल्यानंतर २४ तासांच्या आत जेरबंद केली आहे.
याबाबत सविस्तर असे की, अक्षय जायभाय यास सोन्या सोनवणे या नावाने फोन करून तुला लग्नपत्रिका द्यायची आहे. असे सांगून निंबळक रोडवरील रणजित पेट्रोल पंपाच्या पाठीमागे बोलावले. फिर्यादी संबंधित ठिकाणी आला असता तेथे काटवनात ईटीका कारजवळ थांबलेल्या पाच अनोळखी इसमांनी त्यास सावेडी येथे नेवून फिर्यादीची आई व ओळखीचे राजू मुंगसे यांना फोन करून २० लाख रूपये घेवून या,तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास तुमच्या मुलास जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत अक्षय याच्या आईने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना ही माहिती दिली. पवार यांनी आरोपींच्या शोधासाठी तात्काळ पथके रवाना केली. आपल्या मागावर पोलिस असल्याचे समजताच संबंधित आरोपंीनी अक्षय यास पारनेर तालुक्यातील पानोली घाटात नेवून त्याच्याकडील २ हजार रूपये किमतीची सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतली. त्याला तेथेच सोडून सर्वजण पुण्याकडे निघून गेले.
त्यानंतर अक्षयने आपल्याला आरोपींनी पानोली घाटात सोडून दिल्याचे फोन करून सांगितले.त्यानुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला पानोली घाटातून ताब्यात घेवून स्थानिक गुन्हे शाखेत आनले. या बाबत त्याच्याकडे अधिक चौकशी केली करून राजू मुंगशे याच्या मोबाईलवर अपहरणकर्त्यांनी फोन केल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने आपणच हा गुन्हा वाघोली येथील ओंकार गुंजाळ याच्यासह इतर साथिदारांकडून केल्याची कबुली दिली.
पथकाने ओंंकार यास ताब्यात घेवून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारांची नावे सांगितली. अमन दस्तगिर पटेल वय२० वर्षे राग़ाडेवस्ती वाघोली,ईशाप्पा जगन्नाथ पंदी वय २० वर्षे रा.बकोरी फाटा वाघोली, एक अल्पवयीन मुलास देखील ताब्यात घेतले आहे. तर गणेश बाबा चव्हाण रा.केसनंद हा पसार झाला आहे. यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे गावठी कट्टा,छऱ्याचे पिस्टल,६ ग्रॅम सोन्याची अंगठी,१ लाख रूपये रोख रक्कम, वेगवेगळ्या कंपन्यांचे सात मोबाईल असा एकूण १ लाख ४३ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
ही कारवाई प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील,उपविभागीय पोलिस अधिकारी नगर ग्रामीण अजित पाटील यांच्या सूचना व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिरीषकुमार देशमुख,पोहेकॉ.बाळासाहेब मुळीक,सोन्याबापू नानेकर,पोना.दिपक शिंदे,रवींद्र कर्डिले, विजय ठोंबरे, सुदीप पवार, राहुल सोळुंके, सागर सुलाने,रोहीत मिसाळ,सागर ससाणे, मयूर गायकवाड, दिगंबर कारखिले, चालक संभाजी कोतकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.