अहमदनगर :- विद्यार्थिनींची छेडछाड का करता, असे विचारल्याचा राग आल्यामुळे ८ ते १० रोडरोमिओंनी शिक्षकांवरच दगडफेक केली. हा प्रकार बुधवारी दुपारी रेसिडेंशिअल हायस्कूल व कॉलेजच्या परिसरात घडला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी आले. पोलिसांना पाहून रोडरोमिओंनी पळ काढला. रेसिडेंशिअल शाळेसमोर रस्त्याने ये-जा करणाऱ्या मुलींना काही टारगट मुले छेडछाड करत होते. एक मुलगा यात अग्रभागी होता.

तो शाळेच्या परिसरात आल्यानंतर विद्यार्थिनींनी ही बाब शिक्षकांच्या कानावर घातली. त्यामुळे शिक्षकांनी त्याला बोलावून विचारणा केली. त्या मुलाने बाहेर जाऊन काही मुलांना शाळेच्या परिसरात आणले. या सर्वांनी थेट शिक्षकांवरच दगडफेक करत दहशत निर्माण केली.
- गोल्डन टाइम आला रें…; ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
- राज्यात 2 दिवस पावसाचे ! अहिल्यानगर, पुणे, सातारासह ‘या’ 15 जिल्ह्यातील हवामान बिघडणार
- पोस्टाची सुपरहीट योजना : इथे गुंतवलेले पैसे काही महिन्यातच होतात दुप्पट !
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘या’ बँकेने आणली अनोखी योजना ! तात्काळ मिळणार 35 लाखांचे कर्ज
- राज्य सरकारने सुरू केली नवीन शैक्षणिक कर्ज योजना ! ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार 40 लाखांचे कर्ज













